Video – ‘या’ क्रिकेटपटूने तयार केलं एम. एस.धोनीवर गाणं, सोशल मीडियावर व्हायरल!

धोनीच्या गाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. एखाद्या खेळाडूवर गाणं येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही म्हटले जात आहे.

mahendra-singh-dhoni
महेंद्र सिंग धोनी

भारतामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये चक्क भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर एक गाणं तयार करण्यात आले आहे. हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्ही  धोनीचे फॅन असाल तर तुम्हीही हे गाणं नक्की एन्जॉय कराल.

लॉकडाऊन घोषित होण्याआधी धोनी झारखंडच्या मैदानावर आयपीएलसाठी सरावही करत होता. यानंतर आयपीएलसाठी तो चेन्नईला रवाना झाला. मात्र, कोरोनामुळे आयपीएल कँप रद्द झाल्याने धोनी परत झारखंडला परतला. आयपीएल रद्द झाल्यामुळे धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, “धोनीने पुढच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त करत झारखंड क्रिकेट असोसिएशनकडे तसा प्रस्तावही त्याने पाठवला आहे. शिवाय, त्याने झारखंड क्रिकेटमध्ये सक्रीय होण्याची इच्छाही बोलून दाखवली.

धोनीच्या या गाण्यामुळे त्याचे चाहते चांगलेच आनंदले आहेत. हे गाणं चेन्नई सुपर सिंग्सने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले आहे. या धोनीच्या गाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. एखाद्या खेळाडूवर गाणं येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात स्थान मिळावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. विश्वचषक संघात धोनीची निवड ही त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून होती. यासाठी धोनीने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत घेत होता. मात्र देशात सध्या कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित केलं आहे.