घरमनोरंजनमराठी चित्रपटांत आता येणार 'अरेंज मॅरेज'चा ट्रेंड!

मराठी चित्रपटांत आता येणार ‘अरेंज मॅरेज’चा ट्रेंड!

Subscribe

आजपर्यंत आपण मराठी चित्रपटांमधून लव्ह मॅरेजचा ट्रेंड अनुभवला. पण आता 'तुझं माझं अरेंज मॅरेज' हा अरेंज मॅरेजवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने अरेंज मॅरेजची प्रथा मांडण्यात आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्न आणि लग्न व्यवस्थेवर आधारीत चित्रपटांचा ट्रेंड आला आहे. या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू प्रत्येक चित्रपटातून आपल्या समोर येतात. याच ट्रेंडला धरून आणखी एका चित्रपटाची यात भर पडत आहे. दिनेश शिरोडे दिग्दर्शित ‘तुझं माझं अरेंज मरेज’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने अरेंज मॅरेजची प्रथा मांडण्यात आली आहे. अरेंज मॅरेज करताना उडणारी धम्माल प्रेक्षक नक्कीच आपल्या आयुष्याशी रिलेट करतील. आतापर्यंत प्रेमविवाहावर आधारीत अनेक चित्रपट आले. प्रेमविवाह करताना येणाऱ्या अडचणी या आपण आजपर्यंत चित्रपटातून अनुभवल्या आहेत. मात्र आता अरेंज मॅरेज आणि त्यासंबधीत अडचणी प्रेक्षकांसमोर येणार आहेत!

Tuz Maz Arrange Marriage
तुझं माझं अरेंज मॅरेज

अमोल कागणेची प्रस्तुती

अमोल कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या आधी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या ‘हलाल’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. तसंच ‘लेथ जोशी’, ‘परफ्युम’ या चित्रपटांचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाची कथा-गीतलेखन मयूर परदेशी यांनी केलं आहे. प्रतिक-प्रथमेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या आवाजात गीत संगीतबद्ध केलं आहे. मात्र चित्रपटात कोणते कलाकार असतील? याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे.

‘अरेंज मॅरेज’च्या निमित्ताने दोन कुटुंबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्यावेळी होणारी गडबड हे नाट्यमय असतं. हा सगळा प्रकार मनोरंजक पद्धतीने चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

अमोल लक्ष्मण कांगणे, निर्माते

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -