घरमनोरंजनमहेश बाबूच्या मुलीने जाहिरातीतून मिळालेले 1 कोटी केले दान; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

महेश बाबूच्या मुलीने जाहिरातीतून मिळालेले 1 कोटी केले दान; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Subscribe

टॉलिवूड अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची 11 वर्षाची मुलगी सितारा सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच सिताराने एका ज्वेलरी ब्राँडच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं होतं. ज्याचे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले होते. या जाहिरातीसाठी सिताराला करोडो रुपये मिळाले. परंतु हे पैसे सिताराने स्वतःकडे न ठेवता ते दान केले आहेत.

महेश बाबू झाला भावूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

सिताराची ही जाहिरात न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर देखील झळकली होती. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील जाहिरात पाहून महेश बाबू देखील खूप भावूक झाला होता. त्यावेळी त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिलं होतं की, “टाईम्स स्क्वेअरला उजळणाऱ्या…. माझ्या फायर मुलीचा मला गर्व आहे. तू अशीच उजळत राहा आणि आम्हा सर्वांना आश्चर्यचकित करत राहा.” या जाहिराती व्यतिरिक्त सिताराने तिच्या आईसोबत हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये एक कलेक्शन देखील लाँच केले आहे.

- Advertisement -

सिताराने 1 कोटी केले दान

आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची मुलं अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहेत. मात्र, सितारा अशी एकमेव स्टार किड आहे जिने पहिल्या कमाईचे 1 कोटी दान केले आहेत. सिताराच्या या निर्णयामुळे अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

 


हेही वाचा :

तू कधीच चांगली आई होऊ शकत नाही… आलिया वर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -