घरमनोरंजनकंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये महिमा चौधरीची एन्ट्री; साकारणार ही महत्त्वाची भूमिका

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये महिमा चौधरीची एन्ट्री; साकारणार ही महत्त्वाची भूमिका

Subscribe

चित्रपटामधील इंदिरा गांधी यांच्या जवळची मैत्रिण पुपुल जयकर ही महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा चौधरीचा लूक शेअर करण्यात आला आहे.

कंगना रनौतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील कंगनाची एक झलक दाखवण्यात आली होती. त्यावेळी कंगनाचा इंदिरा गांधींप्रमाणे दिसणारा लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, आता या चित्रपटामधील इंदिरा गांधी यांच्या जवळची मैत्रिण पुपुल जयकर ही महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा चौधरीचा लूक शेअर करण्यात आला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये महिमा चौधरीच्या भूमिकेची एक झलक शेअर केली आहे. पुपुल जयकर या इंदिरा गांधी यांची मैत्रिण होती, शिवाय ती एक लेखिका देखील होती. वयाच्या 15 व्या वर्षापासून ती इंदिरा गांधीची मैत्रिण होती. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री झाल्यानंतर पुपुल त्यांची सांस्कृतिक सल्लागार झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

कंगना रनौतने ही पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “प्रस्तुत आहे महिमा चौधरी, ज्या पुपुल जयकर यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी आयरन लेडी इंदिरा गांधी यांच्या चढ-उतारामध्ये त्यांची साथ दिली. जवळच्या आणि महत्वाच्या गोष्टी जगासमोर मांडल्या. पुपुल जयकर एक मैत्रिण, लेखिका आणि विश्वासू.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

तर, अभिनेत्री महिमा चौधरीने देखील हे पोस्टर शेअर करत लिहिलंय की, “पुपुल जयकर ही भूमिका मिळाल्यामुळे मला खूप उत्सुक आणि अभिमानास्पद वाटत आहे. यासोबतच तिने कंगना रनौतचे देखील आभार मानले आहेत. त्यात तिने लिहिलंय की, कंगना तुम्ही खूप प्रतिभाशाली, निडर, बहादूर आहात आणि मला तुमच्यासोबत इमर्जन्सीमध्ये काम करण्याचा गर्व वाटत आहे.” दरम्यान, याआधी या कंगनाने अभिनेते अनुपम खेर आणि  श्रेयस तळपदेच्या भूमिकेची घोषणा केली होती.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -