घरमनोरंजन’चला हवा येऊ द्या’ शोला कृष्णा घोंगेचा रामराम

’चला हवा येऊ द्या’ शोला कृष्णा घोंगेचा रामराम

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोचा भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. या शोमधील कलाकारांच्या कॉमेडी सेन्सने प्रेक्षक आजवर खळखळून हसवले. मात्र मागील काही दिवसांपासून या शोमध्ये एका कलाकार गैरहजर दिसत आहे. या कलाकाराचे नाव कृष्णा घोंगे असं आहे. कृष्णाच्या गैरहजेरीमुळे त्याने शो सोडला की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र हा कलाकार शोमध्ये न दिसण्यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

चला हवा येऊ द्यामध्ये पुण्यातील कृष्णा घोंगे याने गुंठामंत्री म्हणून चांगली ओळख निर्माण केली. मागील दोन ते तीन आठवडे तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र कृष्णाने एक नवा फोटो शेअर करक तो सध्या काय करतोय याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Ghonge (@krishna_ghonge)

- Advertisement -

कृष्णा घोंगेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रतीक गांधी सोबत ’रिस्क है तो ईश्क है’ म्हणत एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे कृष्णा घोंगे आता झीच्या हिंदी शोमध्ये झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृष्णा झी कॉमेडी शोचा एक भाग बनला आहे. प्रतीक गांधी झी कॉमेडी शोमध्ये आला होता तेव्हा त्याने त्याच्यासोबत हा फोटो काढला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -