घरताज्या घडामोडीगुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना NCB ची पंच म्हणून नेमणूक, शरद पवारांचे एनसीबीवर टीकास्त्र

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना NCB ची पंच म्हणून नेमणूक, शरद पवारांचे एनसीबीवर टीकास्त्र

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकाआघाडीतील नेत्यांसह त्यांच्या कुटुंबियांवर ईडी, सीबीआय, आयडी या केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीचा पदार्फाश केला. आज त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेता, ट्विटरद्वारे ईडीची पोलखोल केली. नवाब मलिक यांनी ट्विट करताना फ्लेचर पटेल कोण आहे? त्याचे भाजपसोबत काय कनेक्शन आहे, असा सवाल केला. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचं आणि चांगल्या लोकांविरोधात पुरावा तयार करून त्यांना अडकवायचं अशा पद्धतीने केंद्रीय चौकशी यंत्रणांचं काम सुरू असल्याचे म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, ‘सध्या ईडी, सीबीआय या केंद्रीय चौकशी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. कोणालाही पकडणं आणि त्याच्याकडून माल सापडला असल्याचे सांगत त्यांच्यासाठी साक्षीदार आणणे. एका केसमध्ये दोन साक्षीदार आणले. त्याच्यातील एक साक्षीदार स्वतः गुन्हेगार असल्याचे नंतर समजले. तो गुन्हेगार आहे, म्हणून त्यांची चौकशी करावी लागली.’

- Advertisement -

पुढे पवार म्हणाले की, ‘नवाब मलिकांच्या जावयाला कस्टडीसाठी जो पंच म्हणून घेतला होता त्याच नाव गोसावी असल्याचे समजले. त्या ठिकाणी गोसावी हा पंच म्हणून आला. त्याने नवाब मलिक यांच्या जावयाबद्दल काय सांगायचं आहे ते सांगितले आणि ज्यावेळेला ही व्यक्ती स्वतःच गुन्हेगार असल्याचं सांगितलं गेलं. त्यादिवसांपासून आजपर्यंत कोणत्याही यंत्रणेला ती व्यक्ती सापडली नाही. पण माझ्या वाचनात आलं की, पुण्याच्या पोलिसांनी त्याला अटक करण्याची वॉरंट पाठवला आहे. त्यामुळे जे स्वतः गुन्हेगार आहेत त्यांना पंच म्हणून नेमायचे काम केले जात आहे.’

‘आजच आणखीन एका व्यक्तीची ही गोष्ट समोर आली, जी व्यक्ती नवाब मलिक यांच्या जावयांच्या केसमध्ये पंच म्हणून घेतली गेली. ती देखील संशयास्पद आहे आणि त्याबद्दलच उत्तर द्या. त्याच्यावर १ ते २ केसेस आहेत आणि अशी व्यक्ती तुम्ही पंच म्हणून घेता याचा खुलासा करा. या व्यक्तीचं नाव फ्लेचर पटेल आहे. हे सर्व सांगायचं तात्पर्य असं, की गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचं आणि चांगल्या लोकांविरोधात पुरावा तयार करून त्यांना अडकवायचं अशा पद्धतीचं काम या विभागातून सुरू आहे,’ असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री….’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -