घरताज्या घडामोडीIT Raid: अधिकाऱ्यांना वरुन फोन येत होते, पाहुणेच छापेमारीत कंटाळले, पवारांचा केंद्रावर...

IT Raid: अधिकाऱ्यांना वरुन फोन येत होते, पाहुणेच छापेमारीत कंटाळले, पवारांचा केंद्रावर निशाणा

Subscribe

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यासंबंधीत कारखाना संचालकांवर आणि अजित पवारांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागाचे अधिकारी नातेवाईकांच्या घरी ५ ते ६ दिवस छापेमारी करत होते. या अधिकाऱ्यांची चौकशी झाली होती पंरतु त्यांना वरुन फोन करुन थांबण्यासाठी सांगण्यात आले होते. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आयकर विभागाचे अधिकारी छापेमारी करताना कंटाळले परंतु तरीही त्यांना थांबवण्यात आले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजू मांडली नाही परंतु त्यांच्याकडून भाजपचे नेते प्रवक्ते असल्यासारखे बोलतात याचा अर्थ स्पष्ट होतो असे देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी कसे षडयंत्र रचत आहे याबाबत शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच आयकर विभागाच्या धाडींवर भाजपचे नेते प्रवक्ता असल्यासारखे बोलतात असे शरद पवारांनी म्हटलं आहे. आयकर विभाग, एनसीबी, ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा केंद्रातील भाजप सरकार ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यांतील सरकार अस्थिर करण्यासाठी वापर करत आहे. महाराष्ट्रात आयकर विभागाने माझ्या कुटुंबीयांच्या घरी छापेमारी केली परंतु या छापेमारीत काहीही सापडले नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत घरातील लोकांची चौकशी केली. काही कागदपत्रांची चौकशी केली. कुटुंबीयांना अजित पवारांसंबंधीत प्रश्न करण्यात आले. हे प्रकरण कोर्टात जाणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांना वरुन फोन, अधिकारी चौकशी करुन वैतागले

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाटेपासून छापेमारी सुरु केली होती. काही दिवसांपासून ही छापेमारी सुरु होती तर सलग ५ ते ६ दिवस छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाच्या छापेमारीत काहीही निष्पन्न झाले नाही. अधिकाऱ्यांचे छापेमारीचे काम पुर्ण झाले होते. मात्र तरीही छापेमारी सुरुच ठेवण्यात आली एकाच वेळी १५ लोकं छापेमारी करण्यासाठी आले होते. सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबीयांना एवढे दिवस पाहुणे घरात परवडत नाहीत. काही नाही कळल्यानंतरही आयकर विभागाचे अधिकारी छापेमारी करत होते. अधिकाऱ्यांचे वागणे चांगले होते परंतु त्यांचे काम संपले असताना त्यांना घरात बसवून ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्यांना वरुन फोन येत होते त्यांना सांगण्यात येत होते की, अजून प्रश्नावली पाठवतो तुम्ही चौकशी करा. शेवटी तेच तेच प्रश्न विचारुन अधिकारी सुद्धा वैतागले होते असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पाहुण्यांचा दोष नव्हता त्यांना वरुन आदेश

शरद पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. अधिकार नसताना चौकशी केली असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच माझी चौकशीला काही तक्रार नाही परंतु काम झाल्यावरही पाहुणचार करता कामा नये. अर्थात याचा पाहुण्याचा दोष नव्हता कारण पाहुण्याला वरुन आदेश होता त्यामुळे ते बसून होते असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय यंत्रणांचा महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणांचा वापर होताना दिसतो.

भाजपचे नेते यंत्रणांच्या कारवाईवर मत स्पष्ट करतात

आयकर विभागाच्या कारवाईवर काही लोकांनी समर्थन केले. छापेमारी हा प्रकार याच्याबद्दल काही लोकांनी मते माडंली. ज्या लोकांनी छापे टाकले त्यांनी येऊन काही खुलासा केला तर समजू शकतो. पण खुलासा करायला भाजपचे नेते समोर येतात एकतर माजी मुख्यमंत्री येतात, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपचे पदाधिकारी यंत्रणांच्या चौकशीवर आपलं मत मांडतात. शासकीय कामांवर तक्रार असताना अधिकाऱ्यांनी भाष्य केलं तर समजू शकतो परंतु भाजपचे नेते समोर येतात यामध्ये सर्व काही समजते असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ‘बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री….’


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -