घरमनोरंजन‘ये रे ये रे पैसा २’ला थिएटर मिळत नसल्याने मराठी कलाकारांचा संताप

‘ये रे ये रे पैसा २’ला थिएटर मिळत नसल्याने मराठी कलाकारांचा संताप

Subscribe

अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा २’ चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसाद ओक, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई केली. परंतू या आठवड्यात ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘ये रे ये रे पैसा २’ला चित्रपटगृह मिळत नसल्याचे समोर आले. अभिनेता प्रसाद ओक याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. अमेय खोपकर यांनी सुध्दा एक व्हीडीओ सोशलमिडीयावर टाकत याबद्दल नाराजी व्यक्त केली.

सरकारला कधी जाग येणार???? भारताच्या स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय… ‘ये रे ये रे पैसा 2’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाने गेल्या आठवड्यात उत्तम पैसे कमवूनसुद्धा ह्या आठवड्यात ह्या चित्रपटाला थिएटर्स मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे कारण दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, ही मराठी चित्रपटांची महाराष्ट्रातील अवस्था आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर मराठी निर्मात्यांनी पैसे कमवायचे तरी कसे…???? अमेय खोपकर गेली 12 वर्षे मराठी सिनेमांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडत आहेत. अशी तकरार सध्या मराठी कलाकार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -