घरताज्या घडामोडीअभिनेत्री रंजना यांची आई ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन

अभिनेत्री रंजना यांची आई ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन

Subscribe

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत माहिती दिली.

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी  निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत माहिती दिली. वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता. पिंजरा या सिनेमात त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यांची ती भूमिका विशेष गाजली होती. अनेक सिनेमात वत्सला यांनी प्रमुख अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. आई, काकू, मावशी, आत्या, आजी अशा अनेक भूमिकेतून वत्सला देशमुख प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.

मुलगी रंजना हिचा अपघात झाल्यानंतर वत्सला यांनी तिची विशेष काळजी घेतली होती. त्यांच्या दोन्ही मुलांचे देखील काही वर्षांपूर्वी निधन झाले. सध्या त्या नातसून आणि नातू यांच्यासोबत राहत होत्या.

- Advertisement -

राक्षसी महत्त्वकांक्षा, सौदामिनी, बेमंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या अनेक नाटकांमध्ये काम केले. त्याचप्रमाणे नवरंग, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की सारखे  हिंदी सिनेमे त्याचप्रमाणे पिंजरा, बाळा गाऊ कशी अंगाई, ज्योतिबाचा नवस सारख्या अनेक मराठी सिनेमात त्यांनी काम केलं.

 

- Advertisement -

काय म्हणावं या मास्तरला, डोस्कं बिस्कं फिरलया का अक्कल गहाण ठिवून आलायसा, काय म्हणते मी, नीट गुमान राव्हायचं असलं तर राव्हा, नाहीतर चालू पडा, हा त्यांचा पिंजरा सिनेमातील गाजलेला डायलॉग.

वत्सला देशमुख यांच्या कुटुंबातील अनेक जण सिनेसृष्टीशी निगडीत होते. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत होते. वत्सला यांची बहिण प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या देखील सिनेसृष्टी आहे. तर मुलगी रंजना यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिलेय. रंजना यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फार कमी वयात रंजना यांनी या जगाचा निरोप घेतला.

लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत वत्सला देशमुख म्हणाल्या होत्या. राजकारण हा माझा आवडीचा विषय आहे. तर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्या सोळा वर्षांनी कॅमेरासमोर आल्या होत्या. तर जय मल्हार ही त्यांची आवडती मालिका होती.


हेही वाचा –  Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी 100 कोटी मंजूर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -