घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2022 : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी 100 कोटी मंजूर

Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी 100 कोटी मंजूर

Subscribe

महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागा देण्यात आली असून त्यासाठी 100 कोटींचा निधी राखून ठेवला आहे.

Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात मांडण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यासाठी 100 कोटी रुपयांची राखीव तरतूद केल्याची घोषणा केली. लता मंगेशकर यांना दिलेला शब्द यावेळी ठाकरे सरकारने पाळला. या घोषणेमुळे लता मंगेशकर आणि संगीत प्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारकडून घेण्यात आला होता. त्याचसंबंधी आजच्या अर्थसंकल्पात बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागा देण्यात आली असून त्यासाठी 100 कोटींचा निधी राखून ठेवला आहे.

- Advertisement -

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची वैशिष्ट्ये

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात कोणत्या सुविधा असतील तसेच या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये काय असतील याबाबत कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.

  • या महाविद्यालयाला लता मंगेशकर यांच्या नावे सुर्वणपदक बहाल केले जाणार आहे.
  • पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडी संशोधन केले जाणार.
  • संगीत विभागात स्थापन होणाऱ्या एक्सलेंस सेंटरमध्ये आधुनिक स्टुडिओ, उपकरणे, तांत्रिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.
  • त्याचप्रमाणे परदेशी विद्यार्थांना देखील या माध्यमातून शिक्षण घेता येणार.
  • लता मंगेशकर यांच्या संगीत कार्यावर सखोल अध्ययन आणि संशोधन केले जाणार.

हेही वाचा – Maharashtra Budget 2022 : राज्यातील समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार, रस्त्यांसाठी 15 हजार 673 कोटींची तरतूद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -