घरमनोरंजनएनसीपीए ‘अॅड आर्ट फेस्टिव्हल’ची सांगता

एनसीपीए ‘अॅड आर्ट फेस्टिव्हल’ची सांगता

Subscribe

२९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर असे तीन दिवस हा सोहळा पार पडणार आहे. रविवार, १ डिसेंबर रोजी सांगता समारोह आहे.

भारताची अव्वल सांस्कृतिक संस्था म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए) तर्फे तीन दिवसीय ‘एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर असे तीन दिवस हा सोहळा पार पडणार आहे. नाटक, नृत्य, भारतीय संगीत, पश्चिमी शास्त्रीय संगीत, जाझ, स्टँड-अप कृती, स्क्रीनिंग, कठपुतली, कार्यशाळा यांची रेलचेल असलेल्या या फेस्टिव्हलचा रविवार, १ डिसेंबर रोजी सांगता समारोह आहे.

समारोहाला दिग्गज कलाकारांचे सादरीकरण

रविवार, १ डिसेंबर रोजी महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. यावेळी ‘मॉर्न टू डस्क’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये राशीद खान, झाकीर हुसेन, अदिती मंगल दास, मालविका सरुक्काई, पंडित शिव कुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित बिरजू महाराज, अजोय चक्रवर्ती, आणि इतर अनेक सुप्रसिद्ध भारतीय संगीत आणि नृत्य कलाकार आपली कला सादर करणार असून संपूर्ण दिवस चालणारा हा कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहे. या कार्यक्रमाबरोबरच महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात एनसीपीएचे नाट्य प्रमुख ब्रूस गुथ्रि यांनी दिग्दर्शित केलेली आणि पारितोषिक विजेते कलाकार जिम सार्भ यांनी सादर केलेली सिमोन स्टीफन्स यांची ‘सी वॉल’ ही एक नवीन कलाकृती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त रॉयस्टन अबेल यांचे ‘द मँगॅनियर सीडक्शन’ हे दृक-श्राव्य सादरीकरण महोत्सवाच्या सांगता समारंभात सादर करण्यात येणार आहे. यामध्ये ४० प्रतिभावान मँगॅनियर संगीत कलाकार, गायक आणि वादक भाग घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -