घरदेश-विदेश#Hyderabad Horror : 'तो' भागच शरीरापासून वेगळा करा', सुबोध भावेचा संताप

#Hyderabad Horror : ‘तो’ भागच शरीरापासून वेगळा करा’, सुबोध भावेचा संताप

Subscribe

ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे',असा संताप सुबोध भावेंने व्यक्त केला आहे.

हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांसह सेलिब्रेटीही या घटनेवर संतप्त भावना व्यक्त करत आपला राग सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत. यावर सुबोध भावेने देखील ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे.

काय म्हणाले सुबोध भावे

‘ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे. डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो’, अशी संतप्त भावना सुबोध भावेने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० या दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

- Advertisement -

आरोपींना जिवंत जाळून टाका

या घटनेमुळे संपूर्ण देशभराता संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पीडित महिलेच्या आईने सर्व आरोपींना जिवंत जाळून टाका अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर मुलीला वाचवता आले असते.


हेही वाचा – धक्कादायक; डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जाळून मारले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -