घरदेश-विदेश#HyderabadHorror : हैदराबाद सामुहिक बलात्काराप्रकरणी चौघांना अटक

#HyderabadHorror : हैदराबाद सामुहिक बलात्काराप्रकरणी चौघांना अटक

Subscribe

तेलगंणा राज्यातील हैदराबादमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर जाळून टाकल्याप्रकरणी अखेर चौघांना अटक करण्यात आली आहे.

तेलगंणा राज्यातील हैदराबादमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर जाळून टाकल्याप्रकरणी अखेर चौघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रियांका रेड्डी असं या २६ वर्षीय तरुणीचे नाव आहे. या तरुणीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी संपूर्ण देशातून निषेध, आंदोलनं केली जात आहे. प्रियांकाला न्याय मिळावा, अशी मागणी करत दिल्लीतील संसदेच्या बाहेर अनु दुबे ही तरुणी आंदोलनाला बसली आहे. आंदोलन करत असताना अनुला महिला पोलिसांकडून मारहाण देखील केली गेली आहे. प्रियांकावर केलेल्या सामुहिक बलात्काराप्रकरणी आणि त्यानंतर तिला जीवंत जाळल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय, प्रियांकावर झालेल्या बलात्कारामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

प्रियांका बुधवारी रात्री दवाखान्यातून घरी परतत असताना तिची दुचाकी अचानक मध्येच बंद पडली. त्यावेळेस तिने बहिणीला कॉल करुन दुचाकी बंद झाली असल्याचं सांगितलं. सोबत आपल्याला या ठिकाणी खूप भीती वाटत असल्याचंही तिने आपल्या बहिणीला फोनवरुन सांगितलं. पण, प्रियांकांचं दुर्दैव एवढं की तिचा फोनही बंद झाला. दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती. सीसीटीव्ही आणि लोकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा सर्व प्रकार व्यवस्थित कट रचून करण्यात आला असल्याचं साइबरादाबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनर यांनी सांगितलं आहे. बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी मोहम्मद आरिफ मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर शिवा स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे सांगितलं की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

- Advertisement -

चार आरोपींना अटक 

तेलंगणा पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला.

‘बहिणीऐवजी पोलिसांना फोन केला असता तर वाचली असती’

देशभरात या घटनेवरुन संताप व्यक्त होत असताना तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी पीडित तरुणीलाच दोषी ठरवलं असून तरुणी इतकी सुशिक्षित होती तर मग पोलिसांना फोन करण्याऐवजी बहिणीला कशाला केला? असा उलट प्रश्न त्यांनी केला आहे. जर बहिणीला फोन करण्याऐवजी तिने पोलिसांना फोन केला असता तर कदाचित वाचवता आलं असता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर यांच्याबद्दल भाजपच्या मनात असूद्या – जयंत पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -