घरमनोरंजननेहा पेंडसेला बिग बॉस सीझन १२चं आमंत्रण?

नेहा पेंडसेला बिग बॉस सीझन १२चं आमंत्रण?

Subscribe

नेहा पेंडसेच्या नावाची बिग बॉसच्या हिंदीच्या सीझन १२साठी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. नेहाला बहुचर्चित बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळणार असं दिसतंय. १६ सप्टेंबरपासून हा सीझन सुरू होत आहे.

‘बिग बॉस १२’च्या सीझनची घोषणा झाली आणि या बिग बॉस हिंदीच्या यंदाच्या पर्वात कोण कोण असणार? याबाबत चर्चा रंगू लागल्या. प्रेक्षकांनी याआधीच्या बिग बॉसच्या सगळ्या पर्वांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीझन या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. मात्र हिदी बिगबॉसचा यंदाचा सीझन मराठी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. १२ व्या सीझनसाठी एका मराठी अभिनेत्रीचं नाव स्पर्धक म्हणून पुढे आलं आहे. या स्पर्धकाचं नाव आहे अभिनेत्री नेहा पेंडसे!

१२ व्या सीझनमध्ये कोण मराठी अभिनेत्री असणार? अभिनेत्री की अभिनेता असणार का? याबाबत उत्सुकता होती. आता यासाठी सध्या नेहा पेंडसेच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. नेहाला बहुचर्चित बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळणार असं दिसतंय. १६ सप्टेंबरपासून हा सीझन सुरू होत आहे. त्यामुळे बिग बॉस चाहत्यांना बिग बॉसच्या स्पर्धकांची मजा, टास्क पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा बिग बॉसचा १२ चा सीझन लोणावळ्यात नाही तर गोव्यात होणार आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – अभिनय ही सहजवृत्ती! – नेहा पेंडसे


नेहाने मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरिक्त नेहा तमिळ, तेलुगु, मल्याळम, चित्रपटांमध्येही दिसली. गेल्या काही दिवसांपासून गायब असणारी नेहा पुन्हा बिग बॉसमुळे ती चर्चेत येणार आहे. नेहा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. नेहाने तिचे अनेक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

A post shared by Neha Pendse (@nehhapendsse) on

- Advertisement -

A post shared by Neha Pendse (@nehhapendsse) on

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे विजेता झाली होती.आता बिग बॉसच्या घरात टिकायला आणि १२ व्या सीझनवर पुन्हा एकदा मराठी नाव कोरायला नेहाला मराठी असण्याचा फायदा होणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे कलाकार आहेत सिझन १२ मध्ये

नेहाबरोबर या सीझनमध्ये मिलींद सोमण, अंकिता कुंवर, विभा छिब्बर, सृष्टी रोडे, देवोलिना भट्टाचार्य, रिध्दिमा पंडित, दिव्या अगरवाल, स्कारलेट मीरोज, शुभी जोशी, शालीन भनोट, महिका शर्मा, एस परिछा, गुरमीत देबिना, शोएब-दीपिका, डेनी डी, परम सिंह स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -