घरमनोरंजनसलमानची भाची अलिजादेखील बॉलीवूड पदार्पणाच्या तयारीत

सलमानची भाची अलिजादेखील बॉलीवूड पदार्पणाच्या तयारीत

Subscribe

आता सलमान खान त्याच्याच कुटुंबातील सदस्याला म्हणजेच अलविरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिजा हिला सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मदत करणार आहे.

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मदत केली आहे. कित्येक कलाकार त्याला न्यूकमर्सचा गॉडफादर म्हणतात. मात्र आता सलमान खान त्याच्याच कुटुंबातील सदस्याला सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मदत करणार आहे. ही नवोदित दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानची भाची अलिजा आहे. सलमान खानची बहिण अलविरा आणि अभिनेता अतुल अग्निहोत्री यांची कन्या अलिजा लवकरच बॉलीवूडमध्ये येत असून तिचा मामूजान तिच्यासाठी चित्रपट बनवणार आहे.

नृत्य, अभिनयाचे धडे गिरवतेय 

अलिजा अग्निहोत्री ही एका खास प्रोजेक्टमधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. या आधी चर्चा होती की, ती सलमान खानच्या लोकप्रिय सीरिज दबंग ३ मधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मात्र आता तिच्या वेगळ्याच प्रोजेक्टची चर्चा आहे. सध्या अलिजा नृत्य आणि अभिनयाचे धडे घेत आहे. सलमान स्वतः तिच्या या सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून आहे. त्याला अलिजासाठी परफेक्ट लाँच हवा आहे. त्यामुळे सध्या तो वेगवेगळ्या स्क्रिप्ट वाचत आहे.

- Advertisement -

या कलाकारांनी दिली आहे संधी 

सलमान खान नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याने अनेक नव्या चेहऱ्यांना लाँच केले आहे. ‘दबंग’मधून त्याने सोनाक्षी सिन्हाला तर हिरो चित्रपटातून अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली यांना संधी दिली आहे. शिवाय डेजी शाह, वरिना हुसैन यांनाही त्याने लाँच केले आहे. अगदी अलीकडे बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्माला सलमानने संधी दिली आहे. लवकरच सलमान आपल्या मित्राचा मुलगा जहीर इकबाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनुतन बहल हिला लाँच करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -