घरमनोरंजनरणबीर आलियानंतर कपूर कुटुंबीयात पुन्हा वाजणार शहनाई; फोटोमधून झाले उघड...

रणबीर आलियानंतर कपूर कुटुंबीयात पुन्हा वाजणार शहनाई; फोटोमधून झाले उघड…

Subscribe

अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) चुलत भाऊ रणबीर कपूरच्या लग्नातील काही खास फोटो तिने इंस्टाग्राम आकाऊंट शेअर केले आहेत. करिश्माने शेअर केले फोटो सोशल मिडियावर खूप चर्चेत आहेत.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचं लग्न हा सध्या घडीला चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप कमी वेळात प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) चुलत भाऊ रणबीर कपूरच्या लग्नातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. करिश्माने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

 

- Advertisement -

आलिया रणबीरच्या लग्नाची उत्सुकता अनेकांना होती. तसेच जेव्हा वधू आलियाने जेव्हा कलिरा तिच्यावर पाडला तेव्हाचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यावेळी करिश्मा कपूर खूप आनंदी होती. या फोटोमध्ये करिश्माने हातामध्ये कलिरा पकडलेला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन (Caption) देताना करिश्मा म्हणाली की, इन्स्टाग्राम vs रियलिटी. कलिरा माझ्यावर पडला मित्रांनो!’ असेही ती पुढे म्हणाली. सुंदर पोज देत ती हसत होती. पुढच्या फोटोमध्ये सर्व मस्ती करताना दिसत आहेत. रणबीर आलियाच्या लग्नामध्ये रिद्धिमा कपूर साहनी, चित्रपट निर्माता करण जोहर हे सर्व उपस्थित होते.

- Advertisement -

 


पंजाबी लग्नाच्या विधींप्रमाणे वधू बांगडीसह कलिरा घालते. त्यानंतर वधू तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर आपले मनगट हालवून ज्याच्यावर कलिरा पडेल, त्याचं लग्न होतं असे म्हटले जाते. म्हणजेच पुन्हा एकदा कपूर कुटुंबात शहनाईचे सूर गुंजणार असून, करिश्मा लवकरच वधू रूपात दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

रणबीर आलियाच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यानंतर हे जोडपे चाहत्यांच्या भेटीलाही बाहेर आले होते. यावेळी नववधू हे प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -