घरक्रीडाIPL 2022 : युझवेंद्र-नटराजनच्या समान 12 विकेट; तरीही सर्वाधिक विकेटच्या यादीत चहल...

IPL 2022 : युझवेंद्र-नटराजनच्या समान 12 विकेट; तरीही सर्वाधिक विकेटच्या यादीत चहल अग्रेसर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलच्या 15 व्या पर्वातील बरेच सामने झाले असून, आता खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायाला मिळत आहे. एक धावा अथावा एक विकेटच्या फरकानं सध्या आयपीएलमध्ये परपल कॅप आणि ऑरेंज कॅपमध्ये लढत पाहायला मिळत आहे.

इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलच्या 15 व्या पर्वातील बरेच सामने झाले असून, आता खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायाला मिळत आहे. एक धावा अथावा एक विकेटच्या फरकानं सध्या आयपीएलमध्ये परपल कॅप आणि ऑरेंज कॅपमध्ये लढत पाहायला मिळत आहे. रविवारी पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादचा जलद गोलंदाज टी नटराजन याने एक विकेट घेतली. या विकेटनंतर नटराजनच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वातील १२ विकेट झाल्या आहेत. तसंच, या १२ व्या विकेटसह नटराजन सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानवार राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे.

कालच्या सामन्यात नटराजनने घेतलेल्या विकेटनंतर नटराजन आणि चहल दोघांनीही समान विकेट मिळवल्या आहेत. मात्र सर्वाधिक विकेटच्या यादीत चहल पहिल्या स्थानी आहे आणि पर्पल कॅपही त्याच्याकडे आहे. कारण चहल नटराजनपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. याशिवाय चहलनं नटराजनपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. त्यामुळं समान विकेट घेऊनही पर्पल कॅप सध्या युझवेंद्र चहलकडेच आहे.

- Advertisement -

या सर्वाधिक गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र आणि नटराजननंतर दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुलदीपच्या नावावर 5 सामन्यांत 11 बळी आहेत. लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खान आणि बंगळुरूच्या वानिंदू हसरंगा यांच्याही प्रत्येकी 11 विकेट आहेत. हे गोलंदाजही टॉप-5 मध्ये आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आणि चेन्नई सुपर किंग्जचा ड्रावेन ब्राव्हो सहा सामन्यांत प्रत्येकी 10 बळी घेत अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर आहेत. तसंच, पंजाब किंग्जचा राहुल चहर आणि सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक देखील 6 सामन्यात प्रत्येकी 9 विकेट्ससह अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी सहा सामन्यांत आठ विकेट्स घेऊन टॉप-10 मध्ये कायम आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : कोरोनाच्या विळख्यात दिल्लीची टीम, एक खेळाडू पॉझिटिव्ह; पुढे काय होणार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -