घरमनोरंजनसायली आणि ओमप्रकाश घेतला 'यु टूर्न'

सायली आणि ओमप्रकाश घेतला ‘यु टूर्न’

Subscribe

या वेबसिरीजचा एक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडिओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.

प्रेमाची एक नवीन ओळख करून देण्यासाठी लवकरच एक नवीन वेबसिरीज ‘यु टर्न’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘यु टर्न’ म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा ‘यु टर्न’. पण हा ‘यु टर्न’ मात्र जरा वेगळा आहे. आता ‘यु टर्न’ नक्की कोणता? कोणाचा? कशासाठी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला ही वेबसिरिज पाहिल्यावरच मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक गाजलेल्या मालिकांमधून दिसणारे दोन चेहरे आपल्याला दिसणार आहेत. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी आपल्याला या वेबसिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे.

या वेबसिरीजचा एक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडिओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत. या वेबसिरीजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisement -

नेहा बडजात्या यांची निर्मिती असलेली ‘यु टर्न’ ही वेबसिरीज मयुरेश जोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. तसेच या वेबसिरीजचे लेखन, संगीत आणि गीते देखील मयुरेश जोशी यांनीच केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -