घरमनोरंजन'ऑस्कर २०१९' - गुनीत मोगांवर कौतुकाचा वर्षाव

‘ऑस्कर २०१९’ – गुनीत मोगांवर कौतुकाचा वर्षाव

Subscribe

गुनित मोगा यांच्या 'पिरियड एंड ऑफ सेंटेस' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. ट्विटरवरून गुनित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, परेश रावल, विकी कौशल यांनी गुनित यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्कर २०१९मध्ये भारतीय चित्रपट नसले तरी भारतीय निर्माती गुनित मोंगा हीचा सगळ्या भारतीयांना अभिमान आहे. गुनित मोंगा या भारतीय वंशाच्या महिलेने ऑस्करमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. गुनित मोगा यांच्या ‘पिरियड एंड ऑफ सेंटेस’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये नसतानाही गुनित मोंगा यांच्या ‘पिरियड एंड ऑफ सेंटेस’ ही भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.

- Advertisement -

त्यामुळे प्रत्येक भारतीय गुनित मोंगा यांचं कौतूक करत आहेत. ट्विटरवरून गुनित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, परेश रावल, विकी कौशल यांनी गुनित यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

असा आहे ‘पिरियड एंड ऑफ सेंटेस’

दिल्लीजवळच्या हापूर गावातील एका महिलेची गोष्ट या चित्रपटात आहे. मासिकपाळी संदर्भात असलेले गैरसमज चित्रपटात दाखवले आहे. हापूर या गावात देखील मासिकपाळीबद्दल अनेक गैरसमज असतात. मासिकपाळी दरम्यान काळजी न घेतल्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते यात दाखवण्यात आलं आहे. या गावात सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशिन बसवलं जातं. पैसे जमा करून हे मशिन्स बसवलं जातं. त्यानंतर महिला पॅड तयार करायला शिकतात. असा ‘पिरियड एंड ऑफ सेंटेस’ हा माहितीपट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -