Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनPoonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू अफवा?... विनीत कक्करने केला खुलासा

Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू अफवा?… विनीत कक्करने केला खुलासा

Subscribe

मॉडेल पूनम पांडेचं 1 फेब्रुवारीच्या रात्री सरव्हायकल कॅन्सरने निधन झाल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी पूनमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमकडून शेअर करण्यात आली होती. ही बातमी वाचताच तिच्या चाहत्यांना मोठ्ठा धक्का बसला. मात्र, पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीसोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले आहेत. अनेकजण तिचा मृतदेह कुठे आहे? कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

पूनम पांडेचा मृत्यू अफवा?

खरं तर, पूनम पांडे मुंबईत लोखंडवाला सारख्या प्रसिद्ध ठिकाणी राहात होती. तिच्या परिसरातील किंवा बिल्डिंगमधील कोणीही तिच्या निधनाशी संबंधीत प्रश्नावर बोलायला तयार नाही. शिवाय वरळी येथे राहणाऱ्या पूनमच्या बहिणीचा फोन काल सकाळपासून स्विच ऑफ येत होता. त्यामुळे काहीजण पूनम पांडेचा मृत्यू अफवा असल्याचं म्हणत आहेत.

- Advertisement -

विनीत कक्करने केला खुलासा

Poonam Pandey Death: Actress Poonam Pandey Passes Away Cervical Cancer,  Poonam Pandey Death News

कंगना रणौतच्या लॉकअफ कार्यक्रमातील पूनम पांडेचा स्पर्धक अभिनेता विनीत कक्करने पूनमच्या निधनाबाबत खुलासा केला आहे. विनीत म्हणाला की, “पूनमचा मृत्यू झालेला नाही, हा पब्लिसिटी स्टंटही नाही. मी पूनमला ओळखतो. ती एक मजबूत स्त्री आहे. मी तिला कित्येकदा वेगवेगळ्या फंक्शनमध्ये भेटलो आहे. तिच्याकडे बघून तिला हा गंभीर आजार आहे असं कोणालाही वाटणार नाही. खरं तर तिचं इंस्टाग्राम अकाऊंट हॉक झालं असेल. याबाबत खरी माहिती लवकरच सर्वांसमोर येईल.” असं विनीत म्हणाला. त्यामुळे आता खरंच पूनमचा मृत्यू झाला आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.


हेही वाचा : Poonam Pandey Death : मृत्यू झाला तर मृतदेह कुठे आहे? शेजारी बोलत नाही, बहिणीचा फोन स्विच ऑफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -