घरठाणेAjit Pawar: लोकप्रतिनिधी असून असं वर्तन..; गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, अजित पवारांकडून संताप...

Ajit Pawar: लोकप्रतिनिधी असून असं वर्तन..; गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, अजित पवारांकडून संताप व्यक्त

Subscribe

मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उल्हासनगर घटनेबाबत संताप व्यक्त केला.

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरूपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उल्हासनगर घटनेबाबत संताप व्यक्त केला. (Ajit Pawar Being a representative of the people and behaving like this Will discuss with Home Minister Devendra Fadnavis express anger from Ajit Pawar)

उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपापसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अजित पवारांकडून संताप व्यक्त

अजित पवार म्हणाले की, उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून, वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली, वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कोणाहीबद्दल माझी काही तक्रार असेल, तर मी ती पोलीस स्टेशनला देईन. संबंधित घटनेबद्दलदेखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

वादाचं रुपांतर गोळीबारात

गणपती गायकवाड यांनी वेळोवेळी त्यांचा आमदार निधी वापरला जात नाही, जाणिवपूर्वक त्रास दिला जात आहे, असे आरोप प्रत्यारोप अनेक वेळा त्यांनी केले आहेत. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड नाराज होते. तीन दिवसांपासून गणपत गायकवाड यांचा कल्याणमध्ये कधी उद्घाटनावरून तर कधी जमिनीवरून वाद सुरू आहे आणि या वादाचा अखेर अंत काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाला.

- Advertisement -

(हेही वाचा: Kalyan Crime: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक; शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या प्रकरणी कारवाई )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -