घरमनोरंजनVideo: चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना प्रिती झाली इमोशनल!

Video: चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना प्रिती झाली इमोशनल!

Subscribe

संपूर्ण जगभरात नववर्ष मोठ्या जल्लोषात साजरे झाले. सेलेब्रेटी मंडळींनीही मोठ्या उस्ताहात नववर्षाचे स्वागत केले. अनेक सेलेब्रेटी सोशलमिडीयाचा आधार घेत चाहत्यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरले नाहीत. यावेळी मात्र अभिनेत्री प्रिती झिंटाने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा काहीश्या वेगळ्या ठरल्या. प्रिती झिंटाने केवळ आपल्या जवळ असलेल्या लोकांचा नाही तर फक्त जे आपल्या कुटूंबासोबत नाहीत अशा लोकांचीही आठवण प्रितीने यावेळी काढली.

काय म्हणाली प्रिती झिंटा?

प्रितीने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. यावेळी तीने नवीन ध्येय साध्य करण्यासाठी चाहत्यांना प्रोस्ताहीत केले. “आज प्रत्येक जण खुश नाही. कारण अनेक जण आज आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत. परंतु नाराज होऊ नका. जिद्दिने काम करा. झालेल्या चुका विसरा आणि नव्या वर्षात नव्या उमेदिने पुन्हा एकदा काम करा. सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” असे ट्वीट प्रितीने केले आहे.

- Advertisement -

प्रितीचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या ट्विटवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला नववर्षाच्या शुभेच्या देखील दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -