घरमनोरंजनप्रियांका आणि क्रिस पॅट करणार 'रोमान्स'

प्रियांका आणि क्रिस पॅट करणार ‘रोमान्स’

Subscribe

लेखक ए.जे लायबरमॅन आणि स्केच आर्टिस्ट रायली रोस्मो यांचे हे कॉमिक बुक २००९ साली आले होते. अॅक्शनवर आधारीत हे कॉमिक प्रसिद्ध होते. आता कॉमिकचा सिनेमा होताना काय काय वेगळं बघायला मिळणार ?

पिग्गी चॉप्स आणि निक जोन्सच्या अफेअरच्या चर्चांनी पापाराझींना चांगलेच खाद्य पुरवले होते. आता प्रियांका आणि निकचा साखरपुडाच झाल्यानंतर पापाराझींना ब्रेक मिळाला. पण आता प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आता बॉलीवूडची देसी गर्ल आणि हॉलीवूडचा क्रिस प्रॅट रोमान्स करणार आहेत. हा रोमान्स रिअल लाईफमधील नसून रिल लाईफमधील असणार आहे. कारण प्रियांका आणि क्रिस एका सिनेमात काम करणार आहेत.

कोणता सिनेमा?

प्रियांका नुकतीच क्वांटिकोमध्ये दिसली होती. त्यानंतर आता एका बीगबजेट सिनेमात ती क्रिससोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे नाव ‘काऊबॉय निंजा विकिंग’ असे असून हा सिनेमा टेन्टपोल प्रोडक्शनचा असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मिशेल मॅकलॅरेन करणार असून या आधी तिने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सिनेमाचे दिग्दर्शनदेखील केले होते. या शिवाय स्र्किन प्लेसाठी देखील तगडी टीम असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा २८ जून २०१९ ला रिलीज होणार आहे.

- Advertisement -
comic_book
‘काऊबॉय निंजा विकींग’च कॉमिक रुप (सौजन्य- eBay)

कॉमिक बुक पासून सिनेमा

कल्पनाविश्व हुबेहूब उभारण्यात हॉलीवूडचा हात कोणीच धरु शकत नाही. काऊबॉय निंजा विकिंग हा सिनेमा देखील एका कॉमिक बुकवर आधारीत आहे. लेखक ए.जे लायबरमॅन आणि स्केच आर्टिस्ट रायली रोस्मो यांचे हे कॉमिक बुक २००९ साली आले होते. अॅक्शनवर आधारीत हे कॉमिक प्रसिद्ध होते. आता कॉमिकचा सिनेमा होताना काय काय वेगळं बघायला मिळणार ?यासाठी २०१९ ची वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -