घरताज्या घडामोडीआई झाल्यानंतर Priyanka Chopraच्या मॅगझिन कव्हरवर दिलखेचक अदा!

आई झाल्यानंतर Priyanka Chopraच्या मॅगझिन कव्हरवर दिलखेचक अदा!

Subscribe

प्रियंका तिच्या कामाबाबत फारच पॅशिनेट असल्याने आई झाल्यानंतर काही दिवसात ती कामाला लागली आहे. एका मॅगझिनच्या कव्हर वर प्रियंकाच्या दिलखेचक अदा पाहायला मिळाल्या. प्रियंकाच्या फॅन पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  नुकतीच आई झाली आहे. २२ जानेवारीला आपण सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची गोड बातमी प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. निक जोनस आणि प्रियंका चोप्रा यांनी आई वडील झाल्यानंतर कामातून ब्रेक घेऊन घरी आलेल्या नव्या पाहुणीची काळजी घेण्यासाठी घरी राहणे पसंत केले. घरी नव्या चिमुकलीचे आगमन झाल्याने प्रियंका आणि तिचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. प्रियंका तिच्या कामाबाबत फारच पॅशिनेट असल्याने आई झाल्यानंतर काही दिवसात ती कामाला लागली आहे. एका मॅगझिनच्या कव्हर वर प्रियंकाच्या दिलखेचक अदा पाहायला मिळाल्या. प्रियंकाच्या फॅन पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

- Advertisement -

प्रियंकाने नुकतेच हार्पर्स बाझार मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले. फेब्रुवारी महिना हा लव्ह रोमांसचा महिना असतो. या कलरफूल महिन्यात प्रियंकाने केलेल्या फोटोशूटचे चाहते कौतुक करत आहेत. प्रियंका यलो कलरच्या वेस्टर्न गाऊनमध्ये फारच गॉर्जियस दिसत आहे. त्याचबरोबर प्रियंकाने ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये देखील कव्हर पेज करण्यात आले आहे. ब्लॅक गाऊनमधील प्रियंकाच्या कातिनाला अदा पाहून तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

- Advertisement -

तर तिसऱ्या फोटोमध्ये प्रियंका एक प्रिंन्सस प्रमाणे दिसत आहे. लेव्हेंडर कलरच्या गाऊनमध्ये प्रियंकाचा फोटो छापण्यात आला आहे. प्रियंकाचे मॅगझिन कव्हरचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलेय, महामारीच्या या काळात सर्वत्र उलथापलथ झाली आहे. या काळात सर्वांना शांतता ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच शांततेच्या मी शोधात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

 

प्रियंकाने तिच्या मुलीची गुड न्यूज दिल्यानंतर मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी तिचे चाहते फार आतूर आहेत. काही दिवसांपूर्वी  सोशल मीडियावर प्रियंका आणि निक यांचे मुलीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. (Priyanka Chopra-Nick Jonas daughter first photo ) मात्र  व्हायरल झालेले फोटो प्रियंकाची भाची क्रिष्णा स्कॉय सारकिसन हिचे असल्याचे सांगण्यात आले.  प्रियंकाची चुलत बहिण दिव्या ज्योतीची ती मुलगी होती.


हेही वाचा – Priyanka Chopra-Nick Jonasच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर लिक? पाहा फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -