घरमनोरंजनविशाल भारद्वाजच्या 'या' चित्रपटात, देसी गर्ल झळकणार

विशाल भारद्वाजच्या ‘या’ चित्रपटात, देसी गर्ल झळकणार

Subscribe

प्रियांका चोप्रा झळकणार असलेला हा नवीन चित्रपट, शेक्सपिअरच्या 'ट्वेल्थ नाईट' नाटकावर आधारित असल्याची महिती समोर आली आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्यानंतर, आता चाहत्यांना वेध लागले आहेत ती या जोडप्याच्या लग्नाचे. प्रियांका आणि निक ‘हवाई’ बेटांवर विवाहबद्ध होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही सेलिब्रिटीजचे चाहते या ‘ग्रँड वेडिंग’ची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान दुसरीकडे प्रियांकाच्या बॉलीवूडमधील पुर्न-पदार्पणाकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हॉलीवूडचे प्रोजेक्ट संपवून मायदेशी परतलेली प्रियांका आता पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शिका सोनाली बोस हिच्यासोबत प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट करत असल्याचं नक्की झालं असून, चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती प्रियांकाच्या दुसऱ्या बॉलीवूडपटाची. प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक विशाल भारद्वाजसोबत तिचा पुढचा चित्रपट करत असल्याचं वृत्त नक्की झालं आहे. विशाल भारद्वाजचा हा नवा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या नाटकावर आधारित असल्याची महिती समोर आली आहे. विशाल भारद्वाजने स्वत: या चित्रपटाची घोषणा केली असून, चित्रपटात प्रियांका लीड रोलमध्ये असल्याचे वृत्तही त्याने नक्की केले आहे. सूत्रांनुसार, २०१९ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : प्रियांका-निकचे धमाल Meme, हसून हसून पुरेवाट

priyanka with vishal bhardwaj
सौजन्य- इन्स्टाग्राम

दरम्यान प्रियांकाने विशाल भारद्वासोबत याआधीही काम केले आहे. विशालच्या ‘कमिने’ आणि ‘सात खून माफ’ या दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता प्रियांका त्याच्यासोबत हा तिसरा चित्रपट करणार आहे. विशेष बाब म्हणजे शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित असलेला विशाल भारद्वाजचा हा पहिला चित्रपट नसणार आहे. विशाल भारद्वाजचे  ‘मकबुल‘, ‘ओमकारा‘ आणि ‘हैदर‘ हे तिन्ही चित्रपट अनुक्रमे ‘मॅकबेथ‘, ‘ऑथेल्लो‘ आणि ‘हॅम्लेट‘ या शेक्सपिअरच्या नाटकांवरच आधारित होते. प्रियांकाला आता लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर पाहिण्यासाठी तिचे चाहचे उत्सुक असणार यात शंकाच नाही.

हेही वाचा : ‘असा’ आहे प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ सिनेमा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -