घरमनोरंजनप्रियांकाच्या 'या' बॉलीवूडपटाचं शूटिंग सुरु !

प्रियांकाच्या ‘या’ बॉलीवूडपटाचं शूटिंग सुरु !

Subscribe

'भारत' सिनेमा सोडल्यानंतर प्रियांकाने आता कोणता नवीन बॉलीवूडपट करत आहे, याविषयी तिचे चाहते उत्सुक आहेत.

हॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडल्यावर आता ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा, पुन्हा एकदा बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. संजय लीला भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात काम केल्यानंतर प्रियांका बॉलीवूडमधून गायबच झाली होती. दरम्यान सलमानसोबतचा ‘भारत’ सिनेमा एकाएकी सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चांगलीच चर्चेत होती. नुकतीच सलमाननेही प्रियांकाच्या या कृतीवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मात्र, ‘भारत’ चित्रपट सोडलेल्या प्रियांकाने भारतात येऊन एका नवीन सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शिका सोनाली बोस हिच्यासोबत प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आता याच सिनेमाचं शूटिंग प्रियांका आणि संपूर्ण टीमने सुरु केल्याचं नक्की झालं आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट ‘तरुण आदर्श’ यांनी याविषयी ट्वीटरवरुन अधिकृत माहिती दिली आहे.

- Advertisement -
हेही वाचा: प्रियांकाने ‘भारत’ सोडल्यावर सलमानची पहिलीच प्रतिक्रिया

 

याआधी प्रियांकाने 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -