घरमनोरंजनपु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा गैरपावर थांबवा - कुटुंबियांची तक्रार

पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा गैरपावर थांबवा – कुटुंबियांची तक्रार

Subscribe

पु. ल. देशपांडे यांच्या नाटकांची, पुस्तकांची रॉयल्टी सुनीताबाईंनी आयुका विज्ञान संस्थेकडे दिली आहे. मात्र लोकसेवा संघ या साहित्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा अरोप पु. ल. देशपांडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

८ नोव्हेंबर २०१८ पासून पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी, वाहिन्यांवर पुलंचे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. यावेळी ‘पुलंचे साहित्य विपरीत रुपात समाजापुढे आणले जात आहे. अशांवर पायबंद घालण्यासाठी आयुका आणि लोकमान्य सेवा संघ यांनी एकत्र यावे’, अशी इच्छा पुलंच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. पुलंचे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे आणि भाचे डॉ. दिनेश ठाकूर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

pul deshpande- Sunilta bai
पु. ल. देशपांडे-सुनीताबाई

पुलंच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात सुनीता बाईंनी आपल्या मृत्युपत्राद्वारे पुलंची नाटकं, संहिता, यातील शब्दही न बदलता सादर करण्याचे हक्क खुले केले होते. पु. ल. देशपांडे यांचे नाटक सादर करायचे असल्यास प्रयोग करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणालाही रॉयल्टी देण्याची गरज नाही, असं सुनीताबाईंनी जाहीर केलं होतं. त्याचप्रामणे पुलंच्या पुस्तकांचे सुनीताबाईंकडचे हक्क त्यांनी पुण्याच्या ‘आयुका’ विज्ञान संस्थेकडे दिले होते.

- Advertisement -

आपल्या पश्चात आपल्या संपूर्ण साहित्याचा समाजासाठी उपयोग व्हावा, अशी सुनीता बाईंची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी या साहित्याचे सर्वाधिकार ‘आयुका’ या विज्ञान संस्थेला दिले आहेत. पुलंचे साहित्य दर्जेदार स्वरूपात सगळ्यांसमोर यावे, त्याची भेसळ आणि होणारी मोडतोड थांबावी, अशी इच्छा कुटुंबियांनी पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

लोकमान्य सेवा संघावर आरोप

समजाला पु.लंच्या साहित्याची मदत व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या पु. ल. देशपांडे फाऊंडेशनचे, लोकमान्य सेवा संघ या संस्थेत विलिनीकरण करण्यात आले. हे विलिनीकरण झाल्यावर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. त्यामुळे पुलंच्या काही साहित्याचे कॉपीराइट आपल्याकडे आले आहेत, असा लोकमान्य सेवा संघाचा समज झाला आहे. मात्र हे अधिकार लोकमान्य सेवा संघाकडे आहेत, याप्रकारची कोणतेही कागदपत्रे न्यायालयात अद्याप सादर झालेली नाहीत. त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -