घरमुंबईरुग्णांना लुटणाऱ्या २२ रक्तपेढ्या 'एसबीटीसी'च्या रडारवर!

रुग्णांना लुटणाऱ्या २२ रक्तपेढ्या ‘एसबीटीसी’च्या रडारवर!

Subscribe

आता रक्तपेढ्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारणे त्यांना महागात पडणार आहे. कारण एसबीटीसी अर्थात राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून अशा रक्त पेढ्यांची तपासणी केली गेली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी परिषदेने केली आहे.

अनेकदा रक्तपेढ्या निर्धारित दरांपेक्षा रुग्णांना जास्त पैसे आकारुन रक्ताच्या पिशव्या देतात. याबाबत विचारणा केली असता अनेकदा उलट उत्तरे रक्तपेढ्यांकडून दिली जातात. त्यामुळे पुन्हा एकदा या रक्तपेढ्यांची बैठक घेऊन चौकशी केली जाणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालानुसार, काही रक्तपेढ्या निर्धारित दरापेक्षा जास्त पैसे आकारत आहेत. त्यामुळे अशा जास्त दर आकारणाऱ्या मुंबईतील २२ रक्तपेढ्यांना जाब विचारण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी) लवकरच बैठक घेतली जाणार आहे. शिवाय, या बैठकीत खासगी रक्तपेढ्यांना रुग्णांकडून जास्त दराची आकारणी का केली जातेय? याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी रक्तपेढ्या रक्त किंवा रक्तघटकांसाठी निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारत असल्याचा प्रकार निदर्शनास आणला होता. शिवाय, अनेकदा रुग्ण ही रक्तासाठी जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी करतात. त्यानुसार, एसबीटीसीने या रक्तपेढ्यांची चौकशी करून रक्तदरांबाबत अहवाल मागवला होता. त्यात अनेक रक्तपेढ्या उत्तरे देण्यास आणि अहवाल सादर करण्यास असमर्थ ठरल्याचं राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

या रक्तपेढ्या ‘एसबीटीसी’च्या रडारवर

  1. नानावटी रुग्णालय रक्तपेढी – विलेपार्ले पश्चिम
  2. होली फॅमिली रुग्णालय रक्तपेढी – वांद्रे पश्चिम
  3. बी. डी. पाटील रुग्णालय रक्तपेढी
  4. एचएन रुग्णालय रक्तपेढी – गिरगाव
  5. बॉम्बे रुग्णालय रक्तपेढी – मरिन लाईन्स
  6. हिंदुजा रक्तपेढी – माहिम
  7. लिलावती रुग्णालय रक्तपेढी – वांद्रे पश्चिम
  8. फोर्टिस रुग्णालय रक्तपेढी – मुलुंड
  9. मसीना रुग्णालय रक्तपेढी – भायखळा पूर्व, माझगाव
  10. एसएल रहेजा रुग्णालय रक्तपेढी – माहिम
  11. मीनाताई ठाकरे रक्तपेढी – गोरेगाव पश्चिम
  12. हेमॅटॉलॉजी लॅबोरेटरी – ओपेरा हाऊस
  13. कोहिनूर रुग्णालय रक्तपेढी – कूर्ला पश्चिम
  14. ब्रिच कँडी रुग्णालय रक्तपेढी – कंम्बाला हिल, दक्षिण मुंबई
  15. ग्लोबल रुग्णालय रक्तपेढी – लोअरपरेल
  16. सायन रक्तपेढी – सायन
  17. कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रक्तपेढी – अंधेरी पश्चिम
  18. बाळासाहेब ठाकरे रक्तपेढी – जोगेश्वरी

दरम्यान जसलोक रुग्णालय रक्तपेढी, एशियय हार्ट रुग्णालय रक्तपेढी, सैफी रुग्णालय रक्तपेढी, महात्मा गांधी सेवा मंदिर रुग्णालय रक्तपेढी आणि सबरबन हायटेक रक्तपेढी या पाच रक्तपेढ्यांनी योग्य निर्धारित रक्तदर आकारले आहेत. तर, मानस सेरोलॉजी इन्स्टिट्यूट रक्तपेढी आणि पल्लवी रक्तपेढी या दोन रक्तपेढींनी अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – खबरदार! जास्त पैसे आकारणाऱ्या रक्तपेढींवर FDAची नजर


काहीवेळा रक्तपेढ्या रक्तासाठी जास्त पैसे आकारतात. डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील रक्तपेढ्यांची चौकशी करण्यात आली होती. या तपासणीत रक्तपिशवीसाठी ठरलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, काही रक्तपेढ्यांनी सरळ नियम पाळायला नकार दिला आहे. तसंच, रक्तावरील प्रोसेसिंग चार्जेस अनेकदा जास्त आकारले जातात. त्यामुळे एफडीए आणि एसबीटीसी मिळून काही रक्तपेढ्यांवर कारवाई करणार आहेत. अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तावर न केलेल्या चाचण्यांचेही पैसे आकारले जात आहेत. त्यामुळे त्या एका रक्ताच्या पिशव्यांचा दर तीन ते चार पट असतो.

चेतन कोठारी, माहिती अधिकार कार्यकर्ते

खासगी पेढ्यांकडून रुग्णांची लूट

हिंदुजा, एचएन आणि कोकिलाबेन रक्तपेढीतील रक्ताची नॅट ही चाचणी केली जाते. त्यामुळे या रक्तपेढ्यांमध्ये जास्तीचे पैसे आकारले जातात. तसंच, काही रक्तपेढ्यांमध्ये रक्तावर न केलेल्या चाचण्यांचेही पैसे आकारले जातात. यासोबतच काही रक्तपेढ्या रक्तघटकांवर जसे की,  प्लाझमा, प्लेटलेट्स यांवर पैसे कमावतात. सरकारच्या नियमावलीनुसार, हेमोफिलिया या रुग्णांना रक्त मोफत पुरवलं गेलं पाहिजे. पण, असेही केले जात नाही.

- Advertisement -

याविषयी, राज्य रक्त संक्रमण परिषद(एसबीटीसी) चे संचालक डॉ. अरूण थोरात यांनी सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यातील काही रक्तपेढ्या ठरलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारणी करत आहेत. यासंदर्भात मुंबईतील २२ रक्तपेढ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. यात रक्तासाठी जादा पैसे का आकारले जात आहेत?  याबाबत रक्तपेढ्यांना प्रश्न केला जाईल.”

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -