घरमनोरंजन'बॉईज २'चं 'हे' धम्माल गाणं एकदा बघाच!

‘बॉईज २’चं ‘हे’ धम्माल गाणं एकदा बघाच!

Subscribe

बॉईज २चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बॉईजमधल्या लग्नाळू या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आता 'गोटी सोडा, बाटली फोडा' हे गाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालं आहे.

‘बॉईज’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या – ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावले आहे. ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हे दोघे आता, ‘गोटी सोडा आणि बाटली फोडा’ म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत सामील करून घेत आहेत. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’च्या धम्माल सिक्वेलमधून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हे गाणे, सोशल नेटवर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील युथफुल मस्ती प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.

कॉलेज तरुणांना वेड लावणाऱ्या या गाण्याचे बोल अवधूत गुप्ते यांनी लिहिले आहेत. त्याचप्रमाणे या गाण्याचे संगीतही त्यांनीच दिले आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि रोहित राऊतने या गाण्याला आपल्या मस्तीभऱ्या आवाजाने रंग चढवला आहे. राहुल-संजीव जोडीचे दमदार नृत्यदिग्दर्शन असलेले हे गाणे प्रेक्षकांनाही बेभान नाचायला भाग पाडणारे आहे. सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे ती ‘बॉईज-2’ या मराठी चित्रपटाची. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. विशाल देवरुखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

कलाकार नवे की जुनेच?

तीन मित्रांचं रंजक पण तितकंच भावनिक जग मूळ बॉईज चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटात सुमंत शिंदे, प्रतीक लाड, रितिका श्रोत्री, संतोश जुवेकर आणि पार्थ भालेराव आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, बॉईज-२ च्या टीझरमध्ये काही नवीन चेहरे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे बॉईजच्या दुसऱ्या भागातील कलाकार नवीन असणार, जुने असणार की नव्या-जुन्या कलाकारांची टीम असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असणार हे नक्की. दरम्यान, ‘बॉईज’ला मिळालेलं प्रेम पाहता ‘बॉईज २’ला देखील तितकंच प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -