घरमनोरंजनफेव्हिक्विकच्या जाहिरातीतील 'त्या' आजीचा मृत्यू!

फेव्हिक्विकच्या जाहिरातीतील ‘त्या’ आजीचा मृत्यू!

Subscribe

दोन महिन्यांपूर्वी फेव्हिक्विक या जाहिरातीतून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आणि एका वर्षापूर्वी अजय देवगणच्या रेड या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या ८५ वर्षीय पुष्पा जोशी या आजींचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी म्हणजेच २६ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

- Advertisement -

२०१८ मधील अजय देवगणचा हिट चित्रपट रेडमध्ये सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका पुष्पा जोशी यांनी साकारली होती. त्यानंतर त्यांनी फेव्हिक्विकच्या जाहिरातीत ही काम केलं होतं. त्या ८५ वर्षांच्या होत्या आणि चित्रपटातील त्यांच्या पात्राला फारच पसंती मिळाली होती.

- Advertisement -

‘रेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावरून पुष्पा जोशी यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. ही माहिती देताना त्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात त्या घरात कोसळल्यानंतर त्यांना फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं ऑपरेशनही झालं होतं. पण, मंगळवारी त्यांचे निधन झाले.

दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ पुष्पा जोशी यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. तुम्ही ‘रेड’ मध्ये अभिनय करणे माझ्या दिग्दर्शनाच्या कारकीर्दीतील एक मोठी घटना होती. तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहाल आणि आनंद पसरवाल. आम्हाला तुमची आठवण येईल. ‘

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -