घरदेश-विदेशसरकारच्या मध्यान्न आहार योजनेचा खेळखंडोबा; १ लीटर दूध वाटलं ८१ मुलांना!

सरकारच्या मध्यान्न आहार योजनेचा खेळखंडोबा; १ लीटर दूध वाटलं ८१ मुलांना!

Subscribe

शिक्षणाचं महत्त्व, लहान मुलांच्या भविष्याची जपणूक या गोष्टी कितीही चर्चेत घेतल्या किंवा मध्यान्न योजनेचा कितीही डांगोरा पिटला, तरी देखील खरी परिस्थिती मात्र भीषण आहे. केंद्र सरकारच्या मध्यान्न योजनेचा बोजवारा कसा उडाला आहे, त्याचा भयानक पुरावाच उत्तर प्रदेशमधल्या एका सरकारी शाळेमध्ये दिसला आहे. या शाळेमध्ये मध्यान्न आहाराच्या नावाखाली अवघं १ लीटर दूध तब्बल ८१ मुलांना वाटण्यात आलं आहे. गंभीर बाब म्हणजे, एका बादलीभर पाण्यात हे दूध मिसळून ते या शाळेतल्या मुलांना वाटण्यात आलं आहे. हे प्रकरण समोर येताच सामाजिक संस्थांनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर मात्र, सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. या प्रकरणी लागलीच तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘जेवढं होतं, तेवढं दूध दिलं’

उत्तर प्रदेशमधल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या चोपन भागात असलेल्या एका गावात हा प्रकार घडला आहे. कोटा गावातील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये एकूण ८१ मुलं शिक्षण घेतात. बुधवारी त्यांना दुपारच्या जेवणावेळी तिथल्या स्वयंपाकीण महिलेने चक्क बादलीभर पाण्यात एक लीटर दूध मिसळून वाढलं. मुलांना हा प्रकार समजत नसल्यामुळे ते पाण्याचं दूध मुलं प्यायली. मुलांना देण्यासाठी फक्त १ लीटर दूधच उपलब्ध होतं, असं शाळेच्या स्वयंपाकीण महिलेकडून नंतर सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

चौकशीचे आदेश

याप्रकरणी शाळेचे प्रमुख शैलेश कनौजिया म्हणाले, ‘या शाळेत एकूण १७१ मुलं शिक्षण घेतात. त्या दिवशी ८१ मुलं हजर होती. माझ्यावर खरंतर दोन शाळांची जबाबदारी आहे. दोन्ही शाळांसाठी दूध देणं आवश्यक होतं. पण मी त्या शाळेत किती दूध गेलं यावर लक्ष ठेऊ शकलो नाही’. याप्रकरणी किमान शिक्षा अधिकारी गोरखनाथ पटेल यांनी सांगितलं, ‘आमच्या लक्षात हे प्रकरण आणून दिल्यानंतर मी शाळेला भेट दिली आणि त्यासंदर्भात मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली. असे प्रकार अजिबात सहन करून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहेत. जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -