घरमनोरंजनमुंबईच्या प्रेमात पाडणारा 'बम्बईरिया' चित्रपट

मुंबईच्या प्रेमात पाडणारा ‘बम्बईरिया’ चित्रपट

Subscribe

'जे लोक मुंबईला पसंत करत नाहीत असे लोकही हा चित्रपट पाहिल्यावर मुंबईच्या प्रेमात पडतील' असं 'बम्बईरिया'चे लेखक मायकल वॉर्ड यांनी म्हटलं आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या अनेक नवीन चित्रपट येऊ घातले आहेत, ज्यामधील एक आहे ‘बम्बईरिया’ चित्रपट. हिंदीमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी मराठमोठी अभिनेत्री राधिका आपटे हिची या चित्रपटांत महत्वाची भूमिका आहे. यामुळे राधिकाच्या चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असणार यात काही शंका नाही. दरम्यान, ‘बम्बईरिया’ चित्रपटात  सिद्धांत कपूर, अक्षय ओबेरॉय, शिल्पा शुक्ला आणि आदिल हुसैन या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. ‘बम्बईरिया’ चित्रपट ११ जानेवारी २०१९ रोजी अर्थात पुढील वर्षीच्या सुरुवाकीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिया सुकन्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, याचे लेखन मायकल ई.वॉर्ड यांनी केले आहे. ‘बम्बईरिया’ या नावावरुनच चित्रपटाची कथा मुंबई शहराशी निगडीत असणार हे स्पष्ट होत आहे.

वाचा: राधिका आपटे करणार ‘अवयवदान’

राधिका आपटेचा हा फोटो ‘बम्बईरिया’तील असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘बम्बईरिया’चे लेखक मायकल वॉर्ड एका कार्यक्रमादरम्यान चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, ‘एक एपिक इंटिमेट कॉमेडी सिनेमा असं मी याचं वर्णन करेन. हा चित्रपट कुणाचेही ऱ्हदय जिंकून घेईल असा आहे. जे लोक मुंबईला पसंत करत नाहीत असे लोकही हा चित्रपट पाहिल्यावर मुंबईच्या प्रेमात पडतील.’ आता हा चित्रपट प्रेक्षकांना मुंबईच्या प्रेमात पाडण्यामध्ये किती यशस्वी ठरतोय? हे पाहण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

वाचा: अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने कोणावर रोखली बंदूक?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -