घरदेश-विदेशतेलंगणाच्या राजकारण्यांना निवडणुकीसाठी पैसे पुरवताहेत महाराष्ट्रातील व्यापारी

तेलंगणाच्या राजकारण्यांना निवडणुकीसाठी पैसे पुरवताहेत महाराष्ट्रातील व्यापारी

Subscribe

आयकर विभागाने नागपूरातील मस्कसाथ परिसरातील एका इमारतीवर छापा टाकल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला. तेलंगणा पोलिसांना नाकाबंधी दरम्यान १० कोटी रुपये मिळाले होते. त्याच पैशांचे कनेक्शन आयकर विभागाने छापा टाकलेल्या नागपूरच्या इमारतीशी असल्याचे समोर येत आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या मस्कसाथ परिसरातील एका इमारतीवर छापे टाकले आहेत. या इमारतीत कोट्यवधी रुपये असल्याचे समोर येत आहे. शिवाय, इमारतीत एक-दोन पैशांचे लॉकर नसून अनेक लॉकर आयकर विभागाला सापडले आहेत. आयकर विभागाला मिळालेल्या लॉकरचा संबंध १९ ऑक्टोबरला तेलंगणा पोलिसांना मिळालेल्या दहा कोटी रुपयांशी आहे. शिवाय, तेलंगणा राज्याची विधानसभा निवडणूकही जवळ आली असल्यामुळे महाराष्ट्रातील व्यापारी तेलंगणाच्या राजकारण्यांना निवडणुकीसाठी पैसे पुरवताहेत? याची चौकशी आयकर विभाग करत आहे.

काय आहे प्रकरण?

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर पोलिसांनी नाकाबंधी सुरु केली आहे. दरम्यान, तेलंगणा पोलिसांना १९ ऑक्टोबरला नोटांनी भरलेल्या चार गोण्या एका वाहनात मिळाल्या. एकूण १० कोटी रुपयांची ही रोख रक्कम आहे. पोलिसांनी याप्रकरणी वाहन चालकाची कसून चौकशी केली. तेव्हा पैसे नागपूरच्या मस्कसाथ परिसरातून आणल्याची कबूली त्याने दिली. वाहन चालकाच्या जबानीवरुन आयकर विभागाने मस्कसाथ परिसरातील एका इमारतीमध्ये गोपनीय चौकशी सुरु केली. तिथे अनेक खासगी लॉकर्स असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. विशेष म्हणजे १९ ऑक्टोबरला मिळालेले १० कोटी रक्कम ही नागपूर शहरातील मिरची आणि ड्रायफ्रूटचे व्यापारी आणि सुरेश एक्सपार्टचे संचालक प्रकाश वाधवानी यांच्या लॉकर्समधून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्या इमारतीत अनेक व्यापाऱ्यांचे लॉकर्स आहेत. त्याचबरोबर या लॉकर्समध्ये कुठल्या राजकीय व्यक्तीचेही पैसे आहेत का? याची चौकशी आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत.

- Advertisement -

खाजगी लॉकर्स सेवा पुरवली जात होती का?

नागपूरच्या मस्कासाथ परिसरातील एका इमारतीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक लॉकर्स मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या लॉकर्समधूनच तेलंगणाला दहा कोटी रुपये रवाना केले जात होते. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर अनेक लॉकर्स त्या इमारतात होते, त्यामुळे त्या इमारतीत कुणीतरी खाजगी पद्धतीने व्यापाऱ्यांना लॉकर सेवा पुरवत आहेत का? याची चौकशी आयकर विभाग करत आहेत.


हेही वाचा – चार दिवसाचा असतानाच आईने निवडणूक बैठकीला नेलं – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -