घरमनोरंजनश्रिया पिळगांवकरने कोणावर रोखली बंदूक? पाहा Video

श्रिया पिळगांवकरने कोणावर रोखली बंदूक? पाहा Video

Subscribe

सध्या चर्चा आहे ती 'मिर्झापूर' या येऊ घातलेल्या वेब सिरीजची. काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरचा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर वेबसिरीजचा आणि त्यातील कलाकारांचा बोलबाला आहे.

सध्या जमाना आहे वेबसिरीजचा आणि गेल्या काही काळात एका हून एक सरस अशा विविध विषयांवरील वेबसिरीज आल्या आहेत. वेब सिरीजमधून हाताळले जाणारे बोल्ड विषय आणि त्यांचं दमदार सादरीकरण यामुळे टेलिव्हिजन आणि चित्रपटांचा बहुतांश प्रेक्षक वेबसिरीजचा चाहता बनला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या सॅक्रेड गेम्स, घौल किंवा लस्ट स्टोरीज अशा अनेक स्टोरीजनी प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. त्याचपाठोपाठ आता सध्या चर्चा आहे ती ‘मिर्झापूर’ या येऊ घातलेल्या वेब सिरीजची. काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरचा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर वेबसिरीजचा आणि त्यातील कलाकारांचा बोलबाला आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकरही मिर्झापूरमध्ये महत्वाची भूमिका साकारते आहे. ट्रेलरमधला श्रेयाचा हटके लूक सर्वांचच आणि विशेषत: मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. यातील एका फ्रेममध्ये श्रिया हातात बंदूक घेऊन कोणावर तरी नेम धरताना दिसत आहे, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलगी असलेल्या श्रेयाने याआधीही काही चित्रपटांमधून तसंच जाहिरातींमधून अभिनय केला आहे.

वेबसिरीजमध्ये झळकलेले मराठी चेहरे

अशाप्रकारे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वेबसिरीजमध्ये काम करणारी श्रिया पिळगांवकर ही पहिलीच मराठी अभिनेत्राी नाही. एक नजर टाकूया, सुपरहिट हिंदी किंवा इंग्लिश वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांवर :

- Advertisement -
सॅक्रेड गेम्स – जितेंद्र जोशी (काटेकर)
सॅक्रेड गेम्स – राधिका देशपांडे (सुभद्रा)
लस्ट स्टोरीज- अमृता खानविलकर (लविना)
TVF पिचर्स – अभिनय महाजन (मंडल)


मिर्झापूरची गोष्ट काय? 

सत्तेच्या मोहाने झपाटलेल्या आणि शेवटी त्यातच संपून जाणाऱ्या दोन भावांचा प्रवास दाखवणारी मिर्झापूर ही मालिका म्हणजे भारताच्या केंद्रस्थानाचे तसेच तरुणाईचे जिवंत चित्र आहे. यातील जग अमली पदार्थ, शस्त्र आणि बेकायदा कृत्यांनी भरलेले आहे. यात जात, सत्ता, अहंकार आणि स्वभाव एकमेकांना छेद देत राहतात आणि हिंसाचार हा जगण्याचा एकमेव मार्ग आहे. असेच या कथेतल्या प्रमुख पात्रांना वाटत असते. या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, विक्रांत मेसी, दिव्येंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, रसिका दुगल, हर्षिता गौर आणि अमित सियाल यांच्या भूमिका पहायला मिळणार आहेत. तुम्ही पाहिलात का या वेबसिरीजचा ट्रेलर…


वाचा : ‘देवदूत’ बनून त्याने वाचवले चिमुरडीचे प्राण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -