घरताज्या घडामोडीMee Vasantrao Trailer : 'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित ! राहूल देशपांडे उलगडणार...

Mee Vasantrao Trailer : ‘मी वसंतराव’चा ट्रेलर प्रदर्शित ! राहूल देशपांडे उलगडणार वसंतराव देशपांडेंचा सांगितीक प्रवास

Subscribe

सिनेमाच्या ट्रेलरमधून सिनेमातील सर्व पात्रांचा अल्प परिचय करण्यात आला आहे. सिनेमात अभिनेता अमेय वाघ मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

Mee Vasantrao Trailer : ‘तुमचं घराणं कोणतं ?’, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देत स्वत:ला गायकीतून सिद्ध करणारे शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांच्या जिवनावर आधारीत मी वसंतराव हा सिनेमा येत्या १ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सुरांची अनोखी मैफील या गुडीपाडव्याला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वत: ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाच्या गोष्टीची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. सिनेमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सिनेमात वसंतराव देशपांडे यांची प्रमुख भूमिका त्यांचे नातू प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे साकारणार आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी हे कलाकारही उपस्थित होते.

- Advertisement -

‘मी वसंतराव’च्या ट्रेलर लाँच निमित्ताने नाना पाटेकर म्हणाले, ” पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले. ‘मी वसंतराव’बद्दल बोलायचं तर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की, अनेकदा मी हा चित्रपट पाहू शकतो. संगीतातील मला फारसं काही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. मात्र हा मराठीतील एक उत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. राहुल संगीत उत्तमच सादर करणार याची मला खात्री होतीच, मात्र एक कलाकार म्हणूनही राहुल सर्वोत्कृष्ट असल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. चित्रपटातील प्रत्येकानंच अप्रतिम कामं केली आहेत.”

- Advertisement -

सिनेमाच्या ट्रेलरमधून सिनेमातील सर्व पात्रांचा अल्प परिचय करण्यात आला आहे. सिनेमात अभिनेता अमेय वाघ मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अनिता दाते हिने वसंतराव देशपांडेंच्या आईची भूमिका निभावली आहे. तर कौमुदी वालोकर हिने वसंतवरांची पत्नी, दुर्गा जसराजने बेगम अख्तर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या सिनेमाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून निपुण धर्माधिकारीने दिग्दर्शन केले आहेत. तर सिनेमात अभिनेता राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


हेही वाचा – आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -