घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात करणार प्रवेश? भाजपाच्या उमेदवार...

Lok Sabha 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात करणार प्रवेश? भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणतात…

Subscribe

Lok Sabha Election 2024 : जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मत व्यक्त केले आहे.

जळगाव : महायुतीत आणि महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील जागांवर दावा केला आहे, तर काही नेत्यांना तिकीट न मिळाल्याने ते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. अशातच आता जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली आहे. याबबात आता भाजपाच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. (Lok Sabha 2024 BJP Smita Wagh Reaction on MP Unmesh Patil entry in Thackeray group)

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : नाशिकची उमेदवारी कोणाला? छगन भुजबळ, हेमंत गोडसे मुंबईला रवाना

- Advertisement -

भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी जळगाव लोकसभेतून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे उन्मेष पाटील नाराज असून त्यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आता जळगावच्या भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील गेले होते. त्यामुळे मला अजूनही असे वाटत नाही की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेश पाटील भाजपामध्येच राहतील.

तसेच, कोणी कसे जीवन जगावे, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. मी एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एक निष्ठा राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता उभी राहील. भाजपाचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

तर, काही झाले तरी मोदींनी जो विकास केलेला आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील आणि प्रचंड मताधिक्याने मी निवडून येईल. असा माझा ठाम विश्वास आहे. मोठे मोठे भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले तरी आमच्यासोबत नरेंद्र मोदी आहेत. विकास कामे आहेत. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही, असे म्हणत भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आपले मत व्यक्त करत खासदार उन्मेष पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. उन्मेष पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावमधून स्मिता वाघ यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा… Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला ठाकरेंचं वाईट करणार नाही; कोण आणि का म्हणालं हे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -