घरताज्या घडामोडीव्हॅलेंटाईन डे च्या काही तास आधीच Rakhi Sawant चा घटस्फोटाचा निर्णय !...

व्हॅलेंटाईन डे च्या काही तास आधीच Rakhi Sawant चा घटस्फोटाचा निर्णय ! सांगितलं हे कारण

Subscribe

बॉलिवूडची ड्रामा गर्ल राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीने तिच्या नवऱ्याला अनेक दिवस सर्वांपासून लपवून ठेवलं होतं आणि अचानक बिग बॉस १५मध्ये राखीने नॅशनल टेलिव्हिजनवर नवरा रितेशला सर्वांसमोर आणलं.

Rakhi Sawant And Ritesh Separated : बॉलिवूडची ड्रामा गर्ल राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीने तिच्या नवऱ्याला अनेक दिवस सर्वांपासून लपवून ठेवलं होतं आणि अचानक बिग बॉस १५मध्ये राखीने नॅशनल टेलिव्हिजनवर नवरा रितेशला सर्वांसमोर आणलं. राखीच्या नवऱ्याला पाहून सगळेच अवाक झाले होते. रितेश राखीचा खरा नवरा आहे की नाही असाही प्रश्न सर्वांना पडला होता. बिग बॉसच्या घरातही दोघांचे नाते फारसे चांगले नव्हते. अखेर राखीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे राखीने नवरा रितेशसोबत घटस्फोट घेतला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीच राखीने हा निर्णय तिच्या चाहत्यांना सांगितला.

राखीने इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत लिहिले आहे, ‘माझे प्रिय मित्र आणि हिंतचिंतक मी तुम्हाला सांगू इच्छिते की, मी आणि रितेश वेगळे झालो आहोत. बिग बॉसच्या घरात आमच्यात अशा काही गोष्टी झाल्या ज्या मी कंट्रोल करु शकले नाही. त्यामुळे आम्ही सहमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला’. राखीने व्हॅलेंटाईन डे च्या काही तास आधी अशी पोस्ट केल्यानंतर सर्वांना चांगलाच धक्का बसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

राखीच्या आयुष्यात आजवर अनेक चढउतार आले आहेत. मोठ्या मेहनतीने राखी बॉलिवूडमध्ये टिकली आहे. बिग बॉसच्या अनेक सीझनमध्ये राखी दिसते. नुकताच तिने बिग बॉस १५ धुमाकूळ घातला. बिग बॉसच्या घरातच राखीने तिच्या लग्नाचे सत्य सर्वांसमोर आणले.

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात रितेशचे वागणे अनेकांना खटकत होते. सलमान खानने देखील रितेशला १-२ वेळा खटकवले होते. तेव्हाच राखी आणि त्यांच्या नात्यात खटके उडाल्याचे सांगण्यात येत आहे. राखीचा नवरा रितेश हा बिग बॉसच्या टीममधील कॅमेरा मॅन असल्याचे देखील बोलले जात होते.


हेही वाचा – रोहनप्रितने दिलं नेहा कक्करला खास Valentine सरप्राइज ! सगळ्यांसमोर नवऱ्याला केलं किस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -