घरमनोरंजनरानू मंडलने गायलं तिसरं गाणं; अनोखा अंदाज बघून व्हाल थक्क!

रानू मंडलने गायलं तिसरं गाणं; अनोखा अंदाज बघून व्हाल थक्क!

Subscribe

१३ वर्षापुर्वी २००६ मध्ये प्रदर्शित झालेला '36 चाइना टाउन' या चित्रपटातील 'आशिकी में तेरी' या गाण्याचे रीमेक आहे.

रेल्वे स्थानकावर गाणारी रानू मंडल आता बॉलिवूडपर्यंत येऊन स्टार बनली आहे. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास संधी देणारा संगीतकार, गायक हिमेश रेशमिया एका पाठोपाठ एक गाणे रिलीज करतोय. ‘तेरी मेरी कहानी’ आणि ‘आदत’ या गाण्याची झलक दाखवल्यानंतर हिमेशने रानूच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या नव्या गाण्यामध्ये रेनूचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.


हेही वाचा: ‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका


हिमेश रेशमियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रानू आत्मविश्वासाने गाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हिमेश देखील सोबत दिसतोय तर रानू स्वतःचं गाणं गात असताना ती स्वतःच एन्जॉय करताना दिसत आहे.  या व्हिडिओमध्ये रानू जे गाणं गाताना दिसतेय ते हिमेशचे गाजलेलं गाणं ‘आशिकि में तेरी’ चे रिक्रिएशन आहे. याविषयीची माहिती स्वतः हिमेशने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच, नव्या गाण्याची तयारी सुरू असून ही फक्त झलक असल्याचे सांगितले.

- Advertisement -

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

हे आहे रानू मंडलने गायलेले तिसरे गाणे

१३ वर्षापुर्वी २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ’36 चाइना टाउन’ या चित्रपटातील ‘आशिकी में तेरी’ या गाण्याचे रीमेक आहे. या गाण्याच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये रानू गाण गात असताना अलाप देताना दिसत आहे. यावेळी बॅकग्राऊंडमध्ये ‘आशिकी में तेरी’ या गाण्याचे म्युझिक प्ले होताना दिसत आहे…

सोशल मीडियावरील पुर्वी व्हायरल झालेल्या दोन गाण्यांप्रमाणेच रानू मंडलच्या तिसऱ्या गाण्याला देखील नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवत रानूचा हा नवा अंदाज व्हायरल केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -