घरमनोरंजनबघा, कसा दिसतोय रणवीर सिंग कपिल देवच्या रुपात

बघा, कसा दिसतोय रणवीर सिंग कपिल देवच्या रुपात

Subscribe

रणवीर सिंग कबीर खान दिग्दर्शित चित्रपट ८३ मध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये खेळावर आधारलेले काही चित्रपट तयार होत आहे. अभिनेता रणवीर सिंग सध्या आपल्या ८३ चित्रपटासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. १९८३ साली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी कपिल देव भारताचा कॅप्टन होता. ८३ हा चित्रपट १९८३ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारीत आहे. यात रणवीर सिंग कपिल देवच्या भुमिकेत दिसणार आहे.

याच चित्रपटातील रणवीर सिंगने पहिला लूक इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ८३ चित्रपटात रणवीर कपिल देवच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना रणवीरने कपिल देवच्या अंदाजात केशरचना आणि चेहऱ्याचा मेकअप केलेला दिसत आहे. असा आगळा वेगळा रणवीरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतोय. रणवीर सिंग कबीर खान दिग्दर्शित चित्रपट ८३ मध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

रेट्रो

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची संपुर्ण कहानी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. रणवीर मागील काही दिवसापासून धर्मशालामध्ये आपल्या संपुर्ण टीमसह कसून मेहनत करताना दिसतोय. यामुळे रणवीरला क्रिकेट या खेळाच्या बारकाई शिकता आल्या आणि कपिल देवचा अंदाज , स्टाईलला कॉपी करू शकला. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाईल.

 

View this post on Instagram

 

LEGEND!?? #KapilDev @83thefilm #blessed #journeybegins @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -