घरमनोरंजनपुन्हा 'आर्ची येणार आर्ची'

पुन्हा ‘आर्ची येणार आर्ची’

Subscribe

लवकरच रिंकू राजगुरूचा कागर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद माने या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

सैराट हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती आर्ची. सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्या ही जोडी खूप गाजली. सैराटनंतर आर्ची पुन्हा कधी चित्रपटात दिसणार याची प्रतिक्षा तिच्या चाहत्यांना होती. मात्र आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सगळ्यांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू कागर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कागर या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकेल यात शंकाच नाही.

रिंगण, यंग्राड यांसारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कागर च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. कागर च्या निमित्ताने अनेक वर्षानंतर रिंकू चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

- Advertisement -

पहिलं पोस्टर प्रदर्शित

रिंकू राजगुरूच्या कागर चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पहिल्या पोस्टरमध्ये तीचा वेगळा लूक बघायला मिळत आहे.तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार जुना जाणार तेव्हाच नवा येणार…’कागर’ असं पोस्टरवर लिहीलं आहे.

- Advertisement -


१४ फ्रेबुवारी प्रदर्शन रद्द

हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -