घरमुंबईलोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा वेळापत्रकात बदल

लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा वेळापत्रकात बदल

Subscribe

लोकसभा निवडणुकांमुळे इलेक्शन काळात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाने लोकसभा निवडणुकीच्या काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षेतील पेपर्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात दोन टप्प्यात निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यात व सिल्वासा या केंद्र शासित प्रदेशात, तर २९ एप्रिल २०१९ रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यामध्ये या निवडणुका होत आहेत. केंद निवडणुक आयोगाने रविवार १० मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे निवडणुक काळात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने याबद्दल माहिती दिली आहे. आगामी लोकासभा निवडणुक महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा ११ एप्रिल, दुसरा १८ एप्रिल, तीसरा २३ एप्रिल तर चौथ्या टप्प्या साठीचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परिक्षा साधारण एप्रिल महिन्यात होत असतात. मात्र निवडणुकांमुळे परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे.

कोणत्या परिक्षा पुढे ढकलल्या ?

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या बीए, बीकॉम या अभ्यासक्रमांच्या परीक्षाच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे. २२ एप्रिल, २३ एप्रिल २४ आणि २९ तसेच ३० एप्रिल या दिवशी येणाऱ्या पेपरच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठा बरोबरच औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब अंबेडकर विद्यापीठाने देखील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. १८ आणि २३ एप्रिल रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. नविन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, परिक्षांचे बदलले वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यातील २३ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीपुर्वी विद्यापीठा अंतर्गत असलेले अनेक महाविद्यालये हे निवडणुकीची केंद्रे असल्याने निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान केंद्रासाठी निवडणूक आयोग सदर महाविद्यालये ताब्यात घेत असते, त्यामुळे एक दिवस आधी म्हणजेच २२ एप्रिल २०१९ या तारखेला तसेच विद्यापीठ व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सक्रीय कामात सहभागी असल्याने मतदान झाल्यानंतर मतपेट्या जमा करेपर्यंत ते कामावर हजार असतात. त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशीच्या परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर होण्याची शक्यता असते, यामुळे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल २०१९ व ३० एप्रिल २०१९ या दिवशी परीक्षेचे पेपर न ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

निकालांवर होणार परिणाम

- Advertisement -

निवडणुकीच्या तयारी साठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांना देखील जबाबदारी देण्यात येते. निवडणुकीच्या साधारण तिन महिने आधीपासूनच नविन मतदार नोंदणी करणे. मतदान कार्ड मतदारांपर पर्यंत पोचवणे यांसारखी कामे शिक्षकांवर सोपवली जातात. तसेच फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात दहावी, बारावी आणि त्याच सोबत शालांत परिक्षा असतात. त्यामुळे विद्यार्थांच्या पेपर तपासणी बरोबरच इलेक्शनच्या कामाचा बोझा देखील शिक्षकांवर पडतो. निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याने शिक्षकांना पेपर तपासणीला उशीर होऊ शकतो. त्यामुळेच निकालांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -