घरमनोरंजनRocky aur rani ki prem kahani: सिनेमातील रणवीर-आलियाचा फर्स्ट लूक आला समोर

Rocky aur rani ki prem kahani: सिनेमातील रणवीर-आलियाचा फर्स्ट लूक आला समोर

Subscribe

असं कॅप्शन दिलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा सिनेमातील लूक या व्हिडिओमध्ये रिवील करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (ranveer singh)आणि आलिया भट्ट (alia bhatt)स्टारर  ‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ (rocky aur rani ki prem kahani) सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. ‘गली बॉय’ या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा आपला जलवा प्रेक्षकांना दाखवण्यास सज्ज होत आहे. फिल्ममेकर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन (Dharma production)अंतर्गत तयार होणाऱ्या  ‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ सिनेमाच्या फर्स्ट शेड्यूलला सुरूवात झाली आहे. करण जोहरने (karan johar) त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर सिनेमाचं शूटींग सूरु झालं असल्याची घोषणा केली आहे. करणने सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर करत लिहले आहे की, ” शेवटी हा दिवस उजाडला. या क्षणी माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत आहेत. आणि सर्वात पहिला विचार आहे तो म्हणजे आभार मानणे, आज आम्ही सिनेमाच्या पहिलं शेड्यूल सुरू करत आहोत. आम्हां सर्वांना तुमच्या  प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे. रोल करण्याची वेळ आली आहे.”(rocky aur rani ki prem kahani film shoot begins ranveer singh alia bhatt first look)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

अभिनेत्री आलिया भट्टने देखील तिच्या सोशल मीडिया अकांऊडवर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या बिहाइंन्ड द सिन व्हिडिओ शेअर करत ‘Too many feels to fit in a caption’ असं कॅप्शन दिलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा सिनेमातील लूक या व्हिडिओमध्ये रिवील करण्यात आला आहे. रणवीर फार कॅजुअल लूकमध्ये दिसत असून आलिया भट्ट ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. टरॉकी और रानी की प्रेम कहनीट मध्ये धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी या दिग्गज कलाकारांची फळी झळकणार आहे.


हे हि वाचा – HBD: संघर्षमय प्रवासाला मागे सारत झाकीर खान बनला प्रसिद्ध स्टँन्डअप कॉमेडियन !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -