घरमुंबईमुंबईकरांनो काळजी घ्या! २६ हजारांहून अधिक नागरिकांना मलेरियाची लागण

मुंबईकरांनो काळजी घ्या! २६ हजारांहून अधिक नागरिकांना मलेरियाची लागण

Subscribe

मुंबई कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नाहीच तोवर डेंग्यू, मलेरिया रुग्ण आढळत असल्याची माहिती समोर येत आहे.
पावसाळा सुरु होताच मुंबईत दरवर्षी डासांच्या संख्येत वाढ होतेय. अनके ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे या डासांच्या संख्या वाढतेय. या डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्य़ासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यात मुंबईत गेल्या ५ वर्षात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती जाहीर झाली आहे. मुंबईत २०१६ ते २०२० या पाच वर्षात २६ हजारांहून अधिक मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दरवर्षी मुंबईत किमान ५ ते ६ हजार मलेरिया रुग्णांची नोंद होतेय. यात ऑगस्ट २०२१ पर्यंत मुंबईत २ हजार ९४३ मलेरियाचे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मलेरिया आजाराने मुंबईकरांची चिंता वाढवलीय.

आज पाळला जातो ‘जागतिक डास दिन’

२० ऑगस्ट १८९७ रोजी तत्कालीन भारतीय वैद्यकीय सेवेतील डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया या रोगाचा प्रसार डासांमुळे होतो ही बाब सिद्ध केली होती. तेव्हापासून २० ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक डास दिन म्हणून पाळला जातो.

- Advertisement -

डासांची संख्या वाढते कशी?

प्रत्येक डास मादी उत्पत्तीच्या ठिकाणी १०० ते १५० अंडी घालते. या एका मादीचे सरासरी आयुर्मान हे ३ आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. या एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डासांची पैदास करते. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढते.

डासांमुळे होणारे आजार

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डासांमुळे तीन प्रकारचे आजार होतात. पहिला म्हणजे मलेरिया. मलेरिया हा आजार एनोफिलस डासांमुळे होतो. जुन महिन्यापासून मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळतात.

- Advertisement -

त्यानंतर दुसरा म्हणजे डेंग्यू. एडिस डासांमुळे या आजाराचे प्रमाण वाढते. साधारण ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढण्यास सुरुवात होते.

तर तिसरा आजार म्हणजे चिकनगुनिया. हा आजार देखीस एडिस डासांमुळे होतो. मात्र मुंबईत गेल्या पाच वर्षात याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

मात्र डेंग्यू, मलेरिया आजारांना रोखण्यासाठी मुंबई महानगरा पालिकेकडून योग्यती काळजी घेतली जाते. पालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत साडेसात महिन्याच्या कालावधीत मुंबईत तब्बल ३९ हजार ४८१ ठिकाणी एडिस एजिप्ती या डेंग्यू डासाच्या अळ्यांना आणि ७ हजार ९२२ ठिकाणी मलेरियाच्या ऍनॉफिलीस स्टिफेन्सी डासांच्या अळ्यांना नष्ट करण्यात आले.


“ही संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सुचना”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -