घरमनोरंजनकाश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सई पल्लवीने मागितली माफी

काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सई पल्लवीने मागितली माफी

Subscribe

"मी अशा माध्यमातून पहिल्यांदाच तुमच्याशी संवाद साधत आहे. मी नेहमीच माझ्या मनात जे असेल ते बोलते. मी माझी बाजू मांडण्यास आणि स्पष्टीकरण देण्यास थोडा उशीर केला आहे, याची मला जाणीव आहे

साउथ चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी तिच्या बेधडक अंदाजामुळे आणि सुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सई पल्लवी काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सई पल्लवी तिच्या आगामी विराट पर्वम चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका इंटरव्यूमध्ये तिने काश्मिरी पंडितांच्या हत्येची आणि मॉब लिचिंगशी तुलना केली. त्यानंतर नवा वाद सुरू झाला. अनेकांकडून सई पल्लवीच्या वक्तव्याची पाठराखण केली जात होती तर अनेकजण तिला विरोध करत होते. मात्र आता सई पल्लवीने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

सई पल्लवी प्रमोशनदरम्यानच्या त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती की, “द काश्मिर फाईल्स चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर अन्याय दाखवण्यात आलेला आहे. तसेच काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम माणसाला अत्यंत विकृत पद्धतीने मारून जबरदस्तीने त्याच्या तोंडून जय श्री राम ही घोषणा करण्यास सांगितली. मग ही सुद्धा धर्माच्या नावावर एक प्रकारची हिंसाच आहे. मग या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे? या दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं सई पल्लवीने म्हटलं होतं. तिच्या या वक्यव्यावरून अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

- Advertisement -

दरम्यान इंस्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह येऊन सई पल्लवी ने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.त्यात ती म्हणाली की, “मी अशा माध्यमातून पहिल्यांदाच तुमच्याशी संवाद साधत आहे. मी नेहमीच माझ्या मनात जे असेल ते बोलते. मी माझी बाजू मांडण्यास आणि स्पष्टीकरण देण्यास थोडा उशीर केला आहे, याची मला जाणीव आहे. पण मला माफ करा. मी केलेलं व्यक्तव्य चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्यात आले आहे मला फक्त एवढंच सांगायचंय की, धर्माच्या नावाखाली कोणत्याही वाद, अहिंसा करणे चुकीचे आहे”.

“त्या मुलाखतीत मला तू डावे आणि उजवे यांपैकी कोणाला पाठिंबा देतेस, असं विचारण्यात आले होते. तेव्हा मी तटस्थ आहे असं उत्तर दिलं. आपल्याला एक चांगला माणूस व्हायला हवे”. असंही सई पल्लवी म्हणाली.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -