घरमनोरंजनSalman Khan- जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Salman Khan- जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Subscribe

सलमानने स्वत:च्या सुरक्षेची तजवीज केली असून महागडी सफेद रंगाची बुलेटप्रुफ निसान पेट्रोल एसयुवी कार खरेदी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडचा दबंग भाईजान सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. याप्रकरणी सलमानने पोलिसात तक्रारही दाखल केली असून त्याला वाय प्लस दर्जाची सिक्युरिटीही देण्यात आली आहे. याचदरम्यान सलमानने स्वत:च्या सुरक्षेची तजवीज केली असून महागडी सफेद रंगाची बुलेटप्रुफ निसान पेट्रोल एसयुवी कार खरेदी केली आहे.

- Advertisement -

सध्या ही गाडी भारतात उपलब्ध नसल्याने सलमानने परदेशातून ही कार खरेदी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच सलमानला शस्त्र बाळगण्याचा परवानाही मिळाला आहे. त्यानंतर त्याने आता ही दोन कोटी किंमत असलेली बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. संपूर्णपणे सुरक्षित असलेली ही कार परदेशात लोकप्रिय आहे. बुलेटप्रुफ काच असलेल्या या कारआधी सलमान टोयोटा लँड क्रूझर ही कार वापरायचा. पण त्याहून अधिक सुरक्षित निसान एसयुवी असल्याने सलमानने या कारला पसंती दिली आहे.

या कारला प्रामुख्याने चारही बाजुने बुलेटप्रुफ काचा असून, सेफ्टीच्या अनेक सुविधा यात देण्यात आल्या आहेत. बी ७ लेवलचे आर्मर या कारमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे स्नायपरने जरी कारवर फायरिंग केले तरी कारमधील व्यक्ती सुरक्षित राहू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -