घरट्रेंडिंगसलमान खान लग्नाआधीच होणार 'बाबा'!

सलमान खान लग्नाआधीच होणार ‘बाबा’!

Subscribe

सलमान लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे तुर्तास सलमान खानचे फॅन्स खूष आहेत.

लग्ना आधीच आई-बाबा होणाचा नवीन ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. अभिनेता तुषार कपूर,एकता कपूर, दिग्दर्शक करण जोहर यांनी लग्ना आधीच आई- बाबा होणं पसंत केलं. आता लवकरच या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. ते म्हणजे बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याची. सलमान लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे तुर्तास सलमान खानचे फॅन्स खूष आहेत.

 

View this post on Instagram

 

So cute ❤️ #SalmanKhan

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub) on

सलमान खान ५३ वर्षांचा झाला आहे. सल्लुभाई लग्न कधी करणार याची चिंता त्याच्यापेक्षा त्याच्या फॅन्सलाच जास्त आहे. सलमानचा एखादा नवीन चित्रपट आला की त्याच्या अफेअर्सची चर्चा सुरू होते आणि सलमान लग्न कधी करणार यावर ती चर्चा येऊन थांबते. लवकरच सलमान भारत चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्याबरोबर कॅतरीना कैफ मुख्य भुमिकेत आहे. सलमान आणि कॅटच्या अफेअरची चर्चापण जोरदार रंगली होती.

- Advertisement -

salman khan

रणबीर आणि कॅटच ब्रेकअप झाल्यानंतर सलमाननेच कतरीनाला सावारलं होतं. यानंतर सलमानने रणबीरशी मैत्रीही तोडली होती. इतकच काय तर कॅतरीनाच्या घरासाठी स्वत: सलमान तीच्या बरोबर फिरला होता. त्यामुळे हे दोघं लग्न कधी करणार याच्या प्रतिक्षेत त्याचे फॅन्स होते.

 

View this post on Instagram

 

#SalmanKhan and #KatrinaKaif for #Bharat! ?

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub) on

- Advertisement -

या आधी बॉलिवूडमध्ये अमिर खान, शाहरूख खान,सनी लियॉनी, तुषार कपूर,एकता कपूर, करण जोहरने सरोगसीचा पर्याय निवडत बाबा होणं पसंत केलं. पण लग्न न करताच बाबा होण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. आता सलमान एखादा मुल दत्तक घेणार की सरोगसीचा पर्याय निवडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Holi from the Weber’s!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -