घरमहाराष्ट्रShirur Loksabha: एकतर मला जागा द्या, नाहीतर भाजपासाठी सोडा; विलास लांडेंकडून 'दादां'ची...

Shirur Loksabha: एकतर मला जागा द्या, नाहीतर भाजपासाठी सोडा; विलास लांडेंकडून ‘दादां’ची कोंडी

Subscribe

शिरूर:लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अवघ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीसंदर्भात तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक सुरू आहेत. अशातच शिरूर मतदारसंघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे. (Shirur Loksabha Either give me a seat or leave it for BJP Grandfather s Dilemma by Vilas Lande)

आयात उमेदवाराला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असाल तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया भोसरी विधानसभेचे माजी आमदार, शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे विलास लांडे यांनी दिली आहे. 2019 मध्ये झालेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांचे मी प्रामाणिकपणे काम केले. आतादेखील आयात उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल, तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल, असा थेट इशारा विलास लांडे यांनी अजित पवार यांना दिल्याने दादांची कोंडी झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले विलास लांडे?

गेली 35 वर्षे मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019ला मला लोकसभा लढवण्यास सांगण्यात आलं. मी 10 वर्षे आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत नाही. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटलं आहे.

विलास लांडे म्हणाले की, अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळरावांना आायत करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपाला जागा सोडून, महेश लांडगेंना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं, आम्ही त्यांचे काम करू, असे विलास लांडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Fadnavis Threat: फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; पोलीस कोठडी रवानगी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -