घरमनोरंजनAryan Khan:आर्यन खानसाठी डाएट प्लॅन आणि मानसिक समुपदेशन

Aryan Khan:आर्यन खानसाठी डाएट प्लॅन आणि मानसिक समुपदेशन

Subscribe

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan)2 ऑक्टोबर रोजी कॉर्डिलीया क्रूझवर एनसीबीने(NCB) केलेल्या छापेमारी दरम्यान अटक करण्यात आली होती. यानंतर आर्यनला तब्बल 25 दिवसानंतर जामीन मंजूर झाला(Aryan Khan Bail). गुरूवारी आर्यनच्या जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची सुटका शनिवारी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली आणि अखरे आर्यन आर्थर रोड जेलमधून सुटला. आर्यनच्या सुटकेनंतर मन्नतवर दिवाळी साजरी करण्यात आली चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर एकच गर्दी केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यनचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र 25 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आर्यनला खूप मोठ्ठा धक्का बसला.(Shah Rukh & Gauri To Pay Special Attention To Aryan Khan’s Physical & Mental Health)

आर्यनला या धसक्यातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख आणि गौरीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आर्यनच्या डेली रुटीनमध्ये संपूर्ण बदल करण्यात येणार असून त्यामध्ये डाएट प्लॅनसह काऊन्सिलिंग,हेल्थ चेकअप सारख्या बाबींचा समावेश आहे. त्यामुळे आर्यनचे आयुष्य पूर्व पदावर आणण्यासाठी गौरी आणि शाहरुख प्रचंड मेहतन घेत असल्याचे दिसतेय. आर्यनच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाहरुख आणि गौरीने एक तज्ञ डॉक्टरांची निवड केली आहे.

- Advertisement -

‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या आरोग्याची चाचणी करण्यात येणार आहे. तुरूंगात राहिल्याने त्याच्या तब्येतीवर तसेच मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आर्यनचे पालक ही विशेष काळजी घेत आहेत. इतकंच नाही तर आर्यनसाठी विशेष काऊन्सलिंग सेशन देखील आयोजीत करण्याचा निर्णय शाहरुख-गौरीने घेतला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर आता विशेष बाब म्हणजे आर्यनला आता सर्वचं पार्ट्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हे हि वाचा – Aryan Khan Released : शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंह विरोधात मराठी अभिनेत्रीने गाठले होते पोलिस ठाणे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -