घरमहाराष्ट्रविधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर; २९ नोव्हेंबरला मतदान

विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर; २९ नोव्हेंबरला मतदान

Subscribe

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी असणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं २४ ऑक्टोबरला वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करुन निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दरम्यान, काँग्रेस या जागेसाठी विधानपरिषदेवर कुणाला पाठवणार? हे पाहावं लागेल.

- Advertisement -

Image

शरद रणपिसे यांची कारकीर्द

शरद रणपिसे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. रणपिसे हे १९७९-८५ या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५ मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळावर सदस्य होते. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -