घरताज्या घडामोडीLive Update: कार्तिकी एकादशी यात्रेला मंदिर समितीचा हिरवा कंदील

Live Update: कार्तिकी एकादशी यात्रेला मंदिर समितीचा हिरवा कंदील

Subscribe

कार्तिकी एकादशी यात्रेला मंदिर समितीने परवानगी दिली आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यास कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहभागी होता येणार


शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण. यांसदर्भात ट्वीट करून मातोंडकर यांनी दिली माहिती

- Advertisement -


क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचाची आर्थर रोड जेलमधून सुटका

- Advertisement -

जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप – रामदास आठवले


एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भेटी गेली असून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे.


प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचं सकाळी निधन झालं. वयाच्या ८९व्या वर्षी प्रभाकर जोग यांनी पुण्यात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.


गेल्या २४ तासांत १२ हजार ८३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ६६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४२ लाख ७३ हजार ३००वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५८ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३६ लाख ५५ हजार ८४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ५९ हजार २७२ सक्रीय रुग्ण आहेत.


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंती निमित्ताने गुजरात येथील केवडिया येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहिले असून त्यांना पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे फुलं अर्पण करून अभिवादन केले.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शक्तीस्थळ येथे आदरांजली वाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -